
जिल्ह्यात वाळवा तालुक्याचा राजकीय दबदबा अधोरेखित
जिल्हाध्यक्षांचा तालुका नवी ओळख : राजकीयदृष्ट्या वाळवा तालुक्याचा दबदबा पहायला मिळत आहे. सिध्दार्थ कांबळे कृष्णा व वारणा नद्यांनी समृद्ध झालेल्या क्रांतिकारी वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात नेहमीच वरचढ ठरला आहे. कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिकसह राजकीय क्षेत्रातही वाळवा तालुका मोठ्या प्रमाणात नावारुपाला आला आहे. सद्यस्थितीत विविध पक्ष व संघटनांच्या जिल्हाध्यक्षांचा वाळवा तालुका अशी नवी ओळख तालुक्याला