सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या फार्म्युल्याने शेतकर्यांना 110 कोटींचा फटका
…अन्यथा 1 डिसेंबरपासून राजारामबापू कारखान्याच्या गेटवर ठिय्या मारणार माजी खा.राजू शेट्टी जनप्रवास, इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेला ऊसदराचा फार्म्युला त्यांच्या पथ्यावर असून ऊस उत्पादक शेतकर्यांना तब्बल 110 कोटींचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसदराचा कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यात लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरचा ऊसदर मान्य असल्याचे