rajkiyalive

संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..

जनप्रवास, सांगली

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसला चांगले नेतृत्व आहे. काँग्रेसचे उमेदवार निवडणुका आल्या की तयार होतात, अशी टीका विरोधी भाजपचे खासदार संजयकाका पाटील करत आहेत. मात्र त्यांनी आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा येणार्‍या निवडणुकीत तुम्हाला तिकीट मिळते का बघावे, त्यांना बाजुला करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचा टोला सांगली लोकसभा मतदारसंघाचे निरिक्षक हुसेन दलवाई यांनी खासदारांना लगाविला.

सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी हुसेन दलावाई सांगलीत आले होते.

सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी हुसेन दलावाई सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ.विश्वजीत कदम, आ.विक्रमसिंह सावंत उपस्थित होते. दलवाई म्हणाले, यात्रा आल्या की काँग्रेसचे पैलवान जागे होतात, असे आरोप खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या इच्छुकांवर केला आहे. मात्र खासदार पाटील यांनी काँग्रेस पक्षात अधिक लक्ष घालू नये. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी मिळते का? याकडे त्यांनी लक्ष द्यावे. सध्या त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांची उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप दलवाई यांनी केला.

हेही वाचा

राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस

सांगली लोकसभेची जागा यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस लढणार

ते पुढे म्हणाले, सांगली लोकसभेची जागा यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस लढणार आहे आणि निवडून देखील येणार आहे. यात काही शंका नाही. सांगली लोकसभेची स्थिती चांगली आहे. जिल्ह्याला चांगले नेतृत्व आहे. दोन आमदार आहेत. आणखी दोन आमदार वाढतील, अशी आशा आहे. तर इतर दोन मतदारसंघात कच्ची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. मतभेद विसरून सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष अधिक मजबूत झाल्याची स्थिती आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आ.विश्वजीत कदम, विशाल पाटील, आ.विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यावर दिली आहे. या सर्वानुमते कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय ते घेणार आहेत. मात्र लोकसभेची जागा निवडून येण्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला.

कर्नाटकमध्ये भाजपने महिलांना साडी व पैसे वाटण्याचा प्रयत्न केला होता.

ते म्हणाले, राज्यात महिला मतदारांची भूमीका महत्वाची असते. जिल्ह्यात पलूस-कडेगाव मतदारसंघ वगळता महिलांची संख्या कमी दिसून आली. कर्नाटकमध्ये भाजपने महिलांना साडी व पैसे वाटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी त्यांच्या तोंडावर फेकून मारला. राज्यात मुस्लिम, दलितसह इतर समाज काँग्रेसकडे येईल. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे दलवाई यांनी सांगितले.

विशाल पाटलांबरोबर जितेश कदमांना उमेदवारी मागणी…

सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी विशाल पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. तशी मागणी देखील सांगली, मिरज व जत तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी पक्ष निरिक्षक हुसेन दलवाई यांच्याकडे केली. तर दुसरीकडे पलूस-कडेगाव मतदारसंघातील काही युवा कार्यकर्त्यांनी जितेश कदम यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे कदम-पाटील वाद पुन्हा उफाळून येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकी नाही. त्यांनी एकी करावी सांगली लोकसभा नव्हे तर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा काँग्रेस जिंकेल, असे मत पक्ष निरिक्षकांकडे मांडले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज