रावसाहेब पाटील ; 1010 कोटींच्या ठेवी झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा
सभासदांनी ठेवरुपाने अपेक्षेपेक्षा मोठा आशीर्वाद दिला आहे. सभासदांनी दिलेला विश्वासाचा मोठा ठेवा आहे. या बळावर येत्या तीन वर्षात कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी दोन हजार कोटीवर आणि शाखांची संख्या शंभरपर्यंत नेण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने 1010 कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण केल्यानिमित्त दैवज्ञ भवन येथे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी सभासदांनी उभे राहून 1010 कोटी ठेविंचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल चेअरमन, संचालक, ठेवीदार, सेवक यांच्या कार्याचे टाळया वाजवून कौतुक केले. सभासदांच्या सहकार्याबद्दल बोलताना रावसाहेब पाटील यांनी संस्थेला सर्वच बाबतीत नंबर एकला नेवून ठेवण्याचा विश्वास सभासदांना दिला.
यावेळी कॉलेज कॉर्नर शाखा, गर्व्हमेंट कॉलनी शाखा, पुष्पराज चौक शाखा, विजयनगर शाखा, लक्ष्मीनगर शाखा येठील नवनियुक्त शाखा सल्लागारांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते झाला.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम यांनी सभासदांचे ऋण व्यक्त करताना सभासद ठेवीच्या रुपाने पुन्हा भरभरुन आशिर्वाद आम्हाला देतील अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात अनेक संस्थांच्या मान्यवरांनी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले. भावे नाट्यमंदीर येथे दुपारी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा भुपाळी ते भैरवी हा संगीत कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी संस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ए. के. चौगुले, वसंतराव नवले. डॉ. एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे, चंदन केटकाळे, डॉ. नरेंद्र खाडे, लालासो थोटे यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे यांनी आभार मानले. संजय सासणे यांनी सूत्रसंचलन केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.