108 आचार्य शांतीसागर महाराज यांचे आचार्य पदारूढ स्थान असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथील भ. 1008 महावीर जिनमंदिरच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात झाला.
भ. महावीर जिनमंदिर लगतच मोठ्या सभागृहाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच नूतन मुनीगुंफा, मंदिराचा जीर्णोध्दार आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सोमवारी मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पूजा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, किरण पाटील, संजय सगोंडा, महावीर पाटील, सुधाकर पालगोंडा, बापूसो ढोले, वीराचार्य पतसंस्थेचे संचालक डि. के. पाटील, रमन ढोले, सचिन उपाध्ये, रूपेश उपाध्ये, बंडू मुंडेे, महाबल मुंडे, साजनीचे प्रतिष्ठाचार्य संम्मेद पंडित, राजू पालगोंडा आदी यावेळी उपस्थित होते. सचिन उपाध्ये यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
मिरज तालुक्यातील समडोळी येथे सुमारे 96 वर्षापूर्वी भ. महावीर जिनमंदिराची उभारणी झाली. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या उपस्थितीत हे मंदिर बांधण्यात आले आहे. लवकरच हे मंदिर शताब्दी वर्षात पदार्पण करणार आहे. आचार्य शांतीसागर महाराज शताब्दी महोत्सव वर्ष आणि भ. महावीर जिन मंदिर शताब्दी वर्ष डोळ्यासमोर ठेवून मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे. मंदिरमध्ये नवीन हॉल, नवीन मुुनी गुंफा, नवीन बोअरवेल, शिखराची रंगरंगोटी, मंदिराची सुशोभिकरण आदी कामे करण्यात येणार आहेत.
डि. के. पाटील यांच्याकडून 25 हजाराची देणगी
शुभारंभादिवशीच वीराचार्य पतसंस्थेचे संचालक डि. के. पाटील यांनी स्व. सुनंदा कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ कलगोंडा पाटील गुरूजी यांच्यावतीने 25 हजाराची देणगी यावेळी जाहीर केली. या अगोदरही अनेकांनी खोली बांधण्यासाठी तसेच इतर कामासाठी मंदिराला देणगी दिले आहेत. येथून पुढेही समाजाच्या या कामासाठी मोठ्या मनाने पुढे येवून देणगीच्या रूपाने हातभार लावावा, असे आवाहन यावेळी मंदिर कमिटी आणि पूजा कमिटीच्यावतीने करण्यात आले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.