rajkiyalive

शिरोली – अंकली महामार्गाचे भूसंपादन करून लवकरच कामास सुरुवात

कागल-सातारा वरील महार्गाच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना

जनप्रवास, जयसिंगपूर
 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल- सातारा या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शिरोली ते कासेगाव या कागल रस्त्यावरील गावातील नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन दि. २  डिसेंबर रोजी प्रत्यक्ष प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील समस्यांची पाहणी करून निराकरण करण्याच्या सूचना नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना खासदार धैयशील माने यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रबंधक श्री पंदारकर यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी तसेच सदर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते कासेगाव  दरम्यान येणाऱ्या शिरोली, मौजे वडगाव, घुणकी, किणी, कणेगाव, येलूर, वाघवाडी, पेठ नाका व कासेगाव येथील शेतकरी नागरिक व सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी, शेतकरी यांच्यासमोर बैठक आयोजित करून त्या मार्गी लावण्यासाठी समस्यांचे निराकरण केले. तर शिरोली – अंकली महामार्गाचे भूसंपादन लवकरच करून कामास सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
        दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांच्या मागणी वरून देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शिरोली ते सांगली रस्ता नॅशनल हायवे ऑथोरिटीकडे वर्ग करून त्या रस्त्याचे चौपदरीकरण कामास मंजुरी दिली आहे.या रस्त्याची चौपदरीकरणाचा डीपीआर तयार झाला असून परवानगीसाठी काम प्रलंबित होते.नॅशनल हायवे अथोरिटीचे चेअरमन यांना प्रत्यक्ष दिल्लीमध्ये भेटून भूसंपादनाची परवानगी प्राप्त केली आहे.
या रस्त्याचे भूसंपादन लवकर करून रस्त्याचे काम सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री. पंदारकर,  नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी,  जिल्ह्याचे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी विवेक काळे, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्याचे भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन महसूल विभाग भूसंपादन विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने या रस्त्याचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच आंबा, पैजारवाडी चौकात या रस्त्याच्याही कामामध्ये असणाऱ्या शासकीय अडथळ्यांच निराकरण करून या रस्त्याचे काम ही जलद गतीने पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना दिल्या खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज