rajkiyalive

चंद्रहार पाटील लोकसभेच्या आखाड्यात

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, कुस्ती क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव, बैलगाडा शर्यतीचे खंदे पुरस्कर्ते डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, अशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मागणी करून राजकीय पटलावर नवा धमाका उडवून दिला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची लोकसभेच्या आखाड्यात एंट्री होणार ? याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

प्रताप मेटकरी, विटा

भारदस्त शरीर, प्रचंड धाडस परंतु मनाने हळवा स्वभाव, बोलण्यात तितकीच नम्रता गोरगरीबांसाठी रात्री अपरात्री धावून जाण्याची वृत्ती या गुणांमुळे पै.चंद्रहार पाटील यांच्या नावाची तरूणाईसह अबालवृध्दांमध्ये क‘ेझ निर्माण झाली आहे. पै.चंद्रहार यांनी कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवून सांगली जिल्ह्याची मान महाराष्ट्रात व संपुर्ण देशात उंचावली आहे. आज राज्यभरातील मल्ल त्यांच्याकडे आदराच्या स्थानाने बघतात. आपल्या सामाजिक जाणीवा कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील मल्टीपर्पज फाऊंडेशनची सन 2015 मध्ये स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच गोवंश संवर्धनाचे काम ही त्यांनी हाती घेतले आहे.

देशातील सर्वांत मोठी रूस्तम – ए – हिंद ही बैलगाडा शर्यत

देशातील सर्वांत मोठी रूस्तम – ए – हिंद ही बैलगाडा शर्यत आयोजित करून बैलगाडाशौकीनांच्यात एक स्थान मिळविले. त्याचबरोबर देशप्रेमाने प्रेरित होऊन जय हिंद महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून 1 लाख रक्त बाटल्या संकलनाचा संकल्प हाती घेतला आहे. जय हिंद महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा जनसंपर्क दौरा करत आहेत. त्याचवेळी विट्यात राष्ट्रकुल कुस्ती संकुलही उभारत आहेत. या सर्व घटनाक‘मांत चंद्रहार हे तरूणांमध्ये लोकप्रिय बनले आहेत.

हेही वाचा

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

त्यांनी सक्रिय राजकारण करावे, अशा प्रतिक्रिया

पै.चंद्रहार यांच्या हातून होत असलेले हे सामाजिक उपक‘म दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यामधून उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यांनी सक्रिय राजकारण करावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अब की बार चंद्रहार असा पुकार होऊ लागला आहे. शुभेच्छा देणार्‍या काही डिजीटल फलकावर तर भावी खासदार, लक्ष वगैरे काही नाही डायरेक्ट फिक्स असा लक्षवेधी उल्लेख करण्यात आला आहे. सध्या जरी पै.चंद्रहार यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत मौन बाळगले असले तरी त्यांच्या समर्थकांतून चंद्रहार यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत मिळू लागले आहेत.

त्यांनी यापुर्वी सांगली जिल्हा परिषदेत भाळवणी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

पै.चंद्रहार पाटील यांना राजकीय क्षेत्र नवे नाही. त्यांनी यापुर्वी सांगली जिल्हा परिषदेत भाळवणी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे. सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळींशी त्यांचा स्नेह आहे. तसेच सध्याचे राजकारण व समाजकारणात सदगुणी व चांगल्या माणसांची पोकळी निर्माण झाली आहे. अशावेळी पै. चंद्रहार पाटील यांच्यासाठी तरूणाईच्या हदयातून दादांनी आता जिल्ह्याचे नेतृत्व करावे, अशी साद घातली जात आहे.

चंद्रहार यांचा समर्थकांमधून भावी खासदार असा उल्लेख

एक खेळाडू व विनम्र व्यक्तीमत्व म्हणून विविध राजकीय पक्षातील बडी मंडळी चंद्रहार यांना मानाचे स्थान देतात. अशा परिस्थितीत चंद्रहार यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले तर ते कोणत्या नेत्याला आणि कोणत्या पक्षाला पसंती देतील ? याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. चंद्रहार यांचा समर्थकांमधून भावी खासदार असा उल्लेख होऊ लागल्याने ते सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर मात्र सर्व राजकीय पक्ष, नेतेमंडळी लक्ष ठेवून आहेत.

राजकारणात सक्रिय झाले तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद असा नेमका कोणता प्लॅटफॉर्म निवडतात याबाबत राजकीय पटलावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या सर्व बाबींवर भाष्य करण्याचे चंद्रहार पाटील टाळत आहेत. परंतु त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर मात्र सर्व राजकीय पक्ष, नेतेमंडळी लक्ष ठेवून आहेत. चंद्रहार यांच्या वाढदिवसाला तरूणाईचा मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी काही दिवसांत त्यांचा राजकीय श्रीगणेशा झाल्यास नवल वाटू नये.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज