rajkiyalive

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न…

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ यउ लागली आहे, तसे अनेकांना खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक उलथापालथी झाल्या. कोण कोणत्या पक्षाबरोबर आहे, हा संशोधनाचा विषय झाला आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मलाच उमेदवारी मिळणार आणि मीच खासदार होणार असे अनेकांना वाटत आहे. गेल्या पाच वर्षात तोंडही न दाखविलेले सदाभाउ खोत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश पाटील यांनी लोकसभेसाठी आपण इच्छुक असून, पक्षाकडे तिकीट मागणार असल्याचे नुकतेच सांगितले. त्यामुळे यंदा हातकणंगले लोकसभा मतदार संघात इच्छुकांची भाउगर्दी होणार हे नक्की आहे, परंतु शेवटपयंंर्ंत यातील कितीजण टिकतात हे ज्या त्यावेळीच ठरेल.

 

 

भाजपकडून आमदारकी आणि मंत्रीपद भोगलेल्या सदाभाउंची विधानपरिषदेची मुदत संपली आहे. त्यांना परत भाजपने संधी दिली नाही. ऐन उमेदीच्या काळात भाजपने त्यांना आपल्याकडे खेचले मंत्रीपद दिले, परंतु आता भाजपला एक दोन आमदांराची गरज नाही, त्यांना अख्खा पक्षच लागतो. त्यामुळे लहान सहान पक्षाकडे भाजपचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामध्ये सदाभाउंचा समावेश आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींचे बोट धरून चळवळीत उतरलेल्या सदाभाउंना चांगले दिवस आले ते राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढल्यानंतर. शरद जोशी यांच्या विचाराशी फारकत घेवून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली.  च्यासोबत सदाभाउही गेली. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी खासदार झाले. 2014 मध्ये राजू शेट्टी भाजपच्या वळचणीला गेले होते. सत्ता आल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाउंना हेरले आणि त्यांना विधानपरिषदेव संधी दिली. त्यांनी राज्यमंत्रीपदही बहाल केले. कृषीराज्यमंत्री झालेल्या सदाभाउंनी शेतकर्‍यांना भरपूर काही करता आले असते, परंतु त्यांनी मंत्रीपदाच्या कारकिर्दीत नेमके काय केले हे तपासून पहावे लागेल.

 

 

सध्या सदाभाउ अधून मधून भाजपवर तोंडसूख घेतात. राजू शेट्टी यांनी आंदोलन केेल्यानंतर त्यांच्या विरोधात बाजू घेवून राजू शेट्टींनी 3500 रूपये दर मिळवून दाखवावे मी कोणतीच निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी प्रत्युत्तर दिले. लगेच त्यांनी आपण भाजपकडे लोकसभेची उमेदवारी मागणार असल्याचे सांगितले. माढा लोकसभा मतदार संघात पराभव पत्करावा लागल्यानंतर सदाभाउंनी विधानपरिषदेवर जाणेच पसंत केले. लोकसभा किंवा विधानसभे त्यांनी कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. गेल्या पाच वर्षातही त्यांचा संपर्क कमी आहे. जणू नसल्यातच जमा आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपमधून उमेदवारी मागितली आहे. राजू शेट्टी हे लोकसभेला उभे राहणार हे नक्की आहे. परंतु आपणही आता इच्छुक असल्याचे सांगून त्यांनी शडडू ठोकला आहे.

सदाभाउंप्रमाणेच इचलकरंजीचे महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनीही नुकतीच राज्यातील अनेक लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनी मराठा कार्ड वापरून निवडणूक लढविली परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. त्यांना पडलेली मते पाहिले तर विचार करण्यासारखे आहे. गेल्या दहा वर्षात तोंडही न दाखविलेल्या सुरेश पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभेची घोषणा केली आहे.

 

 

संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी मोर्चो, आंदोलन, उपोषण करीत असताना सुरेश पाटील यांची भूमिका काय होती हे काही समजायला तयार नाही. त्यांना या आरक्षणाच्या माध्यमातून फार मोठी संधी होती. परंतु त्यांना त साधता आले नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा, हातकणंगले, इचलकरंजी आणि पन्हाळा शाहूवडी या चार विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. तर

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदार समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदार संघात सदाभाउ खोत आणि सुरेश पाटील यांचा कोणताच संपर्क नाही. यापैकी कोठेच त्यांचे हक्काचे व्होेट बँक नाही. मुळात ते कोणत्या पक्षाकडून लढणार हेही नक्की नाही. भाजप सदाभाउंना उमेदवारी देणार काय हाही मोठा प्रश्न आहे. कारण सध्या भाजपकडे प्रकाश आवाडे, राहूल आवाडे, हाळवणकर, धैर्यशील माने यांच्याबरोबर अनेक हौसे गवसे उठून बसले आहेत. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांचा ताळमेळ बसवून त्यांना उमेदवारीचा घोळ मिटवावा लागणार आहे.

सदाभाउंनी मागणी जरी केली असली तरी अजून बरेच पुलाखालून पाणी जाणार आहे. आपण डावात आहोत, हे दाखविण्यासाठीच त्यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश पाटील यांचीही अवस्था तीच आहे. सध्यातरी या दोघांनी उमेदवारीची घोषणा केली असली तरी अजूनही अनेक ऐनवेळचे पैलवान मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज