
रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात
भारतात आणि महाराष्ट्रात शरद जोशी यांनी शेतकर्यांच्या हक्कासाठी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाने भारावून गेलेली शेतकर्यांची अनेक पोरं तालुक्या-तालुक्यातून पुढे आली, नेते झाली. पसारा वाढला की मतभेद वाढतात. शेतकरी संघटनाही अनेकदा फुटली. शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला कायम ठेवत स्वतंत्र चुली जोशींच्या मूळ संघटनेला समांतर संघटना उदयास आल्या. काहींनी प्रस्थापित पक्षांची साथ