
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’
शरद पवळ 2014 मध्ये सांगलीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत भाजपने लोकसभेची जागा जिंकली आणि संजयकाका पाटील खासदार बनले. त्यानंतर 2019 ला देखील ही जागा खासदार संजयकाका पाटील यांनी कायम राखली. मात्र आता सर्व्हेमध्ये सांगलीची जागा धोक्याची दाखविली आहे. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विद्यमान खासदार संजयकाका पाटील तयारी करत असताना