
..न झालेले मुख्यमंत्री, स्व. गुलाबराव पाटील
दिनेशकुमार ऐतवडे, सांगली, 9850652056 (gulabrao patil )काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते स्व. गुलाबराव पाटील यांची जयंती रविवारी साजरी झाली. कर्नाटकातील बेनाडी या छोट्याशा गावातून सांगलीत आलेल्या गुलाबराव पाटील यांनी राजकारणात भलतीच मोठी मजल मारली होती. राज्यसभेचे खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या गुलाबराव पाटील यांना सहकारातील जाणता राजा म्हणून ओळखले जाते. इंदिरा गांधीच्या किचन कॅबिनेटमधील ते एक विश्वासू सहकारी