
जिल्ह्यात 72 वर्षात केवळ चारच महिला आमदार
दिनेशकुमार ऐतवडे देशाच्या राजकारणात अभूतपूर्व घटना घडली आहे. आजपर्यंत महिलांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये 50 टक्के आरक्षण होते परंतु आता विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या विधानसभेत 288 पैकी 96 आमदार महिला असणार आहेत आणि लोकसभेत 547 पैकी 181 खासदार महिला असणार आहेत.