
भाजप
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
खासदारांना पक्षांंतर्गत नेत्यांचा वाढता विरोध, तिकीटासाठी होणार रस्सीखेच अनिल कदम, जनप्रवास लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. असे असले तरी विद्यमान खा. संजयकाका यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.