
मनपाकडून पाणीपुरवठ्याचा विषप्रयोग
नागरीक जागृती मंचकडून पोस्टमार्टेम : टीडीएस तब्बल 313; पाणी पिण्यास अयोग्य : जलशुध्दीकरण केंद्राचा बोगस कारभार जनप्रवास : सांगली कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मनपाच्या अत्याधुनिक जलशुद्धिकरण केंद्राच्या बोगस कारभारामुळे नागरिकांवर पाणीपुरवठ्याच्या नावे विषप्रयोग सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले. नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ढिसाळ व कुचकामी यंत्रणेचे शनिवारी पोस्टमार्टेम केले. यातील