
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा निवडीपूर्वीच गाजवावा
पालकमंत्र्यांकडून प्राथमिक यादी जिल्हाधिकार्यांकडे सादर जनप्रवास : प्रतिनिधी सांगली : जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीची प्रक्रिया माहिती करून न घेताच काहींनी आपली निवड झाली म्हणून गाजवावा सुरु केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काही जणांची प्राथमिक यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडे दिली. त्यानुसार या विभागाने संबंधितांना कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र पाठवले.