MIRAJ : वड्डीत शेतकर्याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना
झोळीत घालून मृतदेह बाहेर काढला मिरज / प्रतिनिधी MIRAJ : वड्डीत शेतकर्याच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना : मिरजेतील पाटील गल्ली येथे राहणारे संतोष मनोहर येसुमाळी (वय 40) यांचा मिरज तालुक्यातील वड्डी येथील येसुमाळी वस्तीवर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेह बाहेर आणण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना झोळीत घालून एक किलोमीटर पायपीट करत त्यांना बाहेर आणावे लागले.