विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन
जनप्रवास । सांगली विधानसभेसाठी विश्वजीत कदमांसमोर जयश्रीताई समर्थक करणार शक्तीप्रदर्शन : काँग्रेसचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्काराचे नियोजन मदनभाऊ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. गुरूवारी सांगलीतील डेक्कन हॉलला हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला आ. विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे असणार आहेत. या निमित्ताने जयश्रीताई पाटील समर्थक आ. विश्वजीत कदम यांच्यासमोर विधानसभेसाठी शक्तीप्रदर्शन करणार आहेत.