
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार
कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केले नाही.मोदी सरकार हे मुठभर लोकांच्यासाठी आहे.सर्वसामान्य जनतेसाठी नाही. यामुळे देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे. देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे.