badlapur news : 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; ’बदलापूर’चं गुपित काय?
मुंबई : badlapur news : 15 दिवसांचे सीसीटीव्ही गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; ’बदलापूर’चं गुपित काय? ” बदलापूरच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आता एन्काऊंटर झाला आहे. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती आहे.