
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
इंदापूर – गेली 6 दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची भूमिका असते. त्यामुळे आम्ही आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशीही चर्चा झाली त्यांना माझ्या निर्णयाची कल्पना दिली. शरद पवारांच्या