
sangli congress news : फितवल्याने जयश्रीताईंची बंडखोरी; त्याची खैर नाही: आ. विश्वजीत कदम
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे. सांगलीत झालेली बंडखोरी दुर्दैवी आहे. पण जयश्रीताई भोळ्या आहेत. त्यांना कुणीतरी फितवले असल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. पण ज्या दिवशी मला त्याचे नाव कळेल, त्या दिवशी त्याची खैर नाही, असा इशारा काँग्रेसचे युवा नेते आ. विश्वजीत कदम यांनी दिला. माझ्यावर डॉ. पतंगराव कदम यांचे संस्कार आहेत.