
sangli news : जिल्ह्यात मुरुम, वाळू तस्करांची मुजोरी
विक्रम चव्हाण sangli news : जिल्ह्यात मुरुम, वाळू तस्करांची मुजोरी : जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी विशेषतः दुष्काळी तालुक्यांमध्ये मुरुम आणि वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. महसूल अधिकारी, कर्मचार्यांना धमक्या देणे, जप्त्ा केलेले डंपर, ट्रॅक्टर पळवूण नेण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे. राजकिय वरदहस्ताने हे सर्व प्रकार सुरु असल्याने अधिकार्यांनाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.