
pahalgam news : पहलगाममध्ये जिल्ह्यातील 24 जण अडकले
pahalgam news : पहलगाममध्ये जिल्ह्यातील 24 जण अडकले जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील अंदाजे 24 पर्यटक जम्मू-काश्मिर मध्ये आहेत. या नागरिकांची सर्व सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात आली असून हे सर्व नागरिक सुरक्षित आहेत. या नागरिकांना सांगली जिल्ह्यात लवकरात लवकर परत आणण्याकामी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले. pahalgam