
swabhimani news : संधीची साखर आणि स्वाभिमानाचा सौदा
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 swabhimani news : संधीची साखर आणि स्वाभिमानाचा सौदा: कधी काळी रणांगणावर शेतकर्यांच्या हक्कासाठी लढणार्या सेनापतीच्या खांद्यावरती विश्वासाने ठेवलेला हात, आज एका नव्या राजकीय वळणावर येऊन थांबला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकेकाळचे आघाडीचे योद्धा, सावकार मादनाईक यांनी अखेर भगव्याचा स्वीकार केला. आयुष्यभर शेतकर्यांच्या वेदनांना आवाज देणार्या, ऊसदराच्या लढ्यांत अग्रेसर असलेल्या मादनाईकांनी अखेर आपली तलवार