rajkiyalive

KOLHAPUR LOKSABHA : राजे अन् राजूंची उमेदवारी भाजपला धास्ती?

KOLHAPUR LOKSABHA : राजे अन् राजूंची उमेदवारी भाजपला धास्ती? :  येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मिशन 45 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा मिळवायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. महायुतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला आहेत. संजय मंडलीक आणि धैर्यशील माने हे सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्याच आठवड्यात आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महाआघाडीचा उमेदवार सर्वांचा पसंतीचा असेल, असे जाहीर केले होते. त्यांचा रोख छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आहे, हे सर्वांना कळून चुकले आहे. इकडे हातकणंगलेमध्ये महाआघाडी राजू शेट्टींना घेण्यास इच्छुक आहे. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या बैठकाही झाल्या आहेत. त्यामुळे जर का कोल्हापुरात संभाजी राजे आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांची उमेदवारी भाजपला पर्यायाने शिवसेना शिंदे गटाला नक्कीच डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.

 

KOLHAPUR LOKSABHA : राजे अन् राजूंची उमेदवारी भाजपला धास्ती?

दिनेशकुमार ऐतवडे

एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी खा. धनंजय महाडिक ही भाजपकडून इच्छुक आहेत. भाजपही त्यांना तयारीला लागा असे सांगितले. आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी नाराजी आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मलाच मिळणार असे सांगत खा. संजय मंडलिक तयारीलाही लागले आहेत. त्याच्याबद्दल नाराजी असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे उमेदवारी आम्हालाच मिळणार असे भाजपही सांगत आहेत.

संभाजीराजेही भाजपवर नाराज आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरचा उमेदवार सर्वांच्या पसंतीचा असेल असे म्हणाले होते. त्यांचा इशारा संभाजीराजेंकडे आहे हे सर्वांना कळून चुकले आहे. संभाजीराजेही भाजपवर नाराज आहेत. भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली असली तरी त्यांनी वेगळा पक्ष काढून आपली ताकद राज्यात दाखविण्यासा सुरूवात केली आहे. महाआघाडी त्यांना आपल्या गोटात घेण्यास इच्छुक आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत महाआघाडीकडून छत्रपती संभाजी राजेच उमेदवार असतील असे संकेत बांधले जात आहेत.

सध्या धनंजय महाडिक यांची ताकद वाढली आहे.

कोल्हापुरात भाजपची जरी ताकद असली तरी उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा असल्यास भाजप कितपत जोर लावणार हे सांगणे कठीण आहे. गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. सध्या धनंजय महाडिक यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे धनंजय महाडिक खा. मंडलिकांचा प्रचार करणार काय, हा कळीचा मुद्दा आहे. कोल्हापूरचे मंडलिक घराणे कायमच महाडिक घराण्याच्या आडवे येत आहे. त्यांचे पारंपरिक विरोध आहे. त्यामुळे महाडिक घराणे मनापासून त्यांचा प्रचार करणार नाही, असे अनेकांना वाटते. त्यातच संभाजीराजेंची उमेदवारी असल्याने संपूर्ण मराठा समाज राजेंच्या पाठिशी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजेंची उमेदवारी असली तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला डोकेदुखी ठरेल यात शंका नाही.

 

 

विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होत आहे.

दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदार संघातही तीच अवस्था आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होत आहे. भाजपकडून माजी आमदार हाळवणकर, राहूल आवाडे, माजी मंत्री सदाभाउ खोत हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. पक्षाकडे त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणीही केली आहे. भाजप या जागेवरही डोळा ठेवून आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धैर्यशील माने यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने शिंदे ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काय करणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

राजू शेट्टी यांनी उसदर आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे.

महाआघाडी त्यांच्या स्वागताला इच्छुक आहे. राजू शेट्टी यांच्यासाठी महाआघाडीने ही जागा मोकळी सोडली आहे. राजू शेट्टी यांची उमेदवारी या मतदार संघातून पक्की आहे, फक्त शेट्टी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूरची जबाबदारी सतेज पाटील आणि हातकणंगेलची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. सतेज पाटील राजकीय बाजी पलटविण्यात माहिर आहेत. त्यामुळे संभाजीराजेंच्या रूपाने सतेज पाटील कोल्हापूरात इतिहास घडवितील यात शंका नाही. तीच परिस्थिती हातकणंगलेमध्ये आहे. जयंत पाटील यांचे इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघात वर्चस्व आहे. शिरोळ मतदार संघ राजू शेट्टी यांचा हक्काच असला तरी येथही जयंत पाटील यांना मानणारा गट आहे. इचलकरंजीत राहूल आवाडे जर नाराज झाले आणि भाजपचा उमेदवार नसला तर येथे धैर्यशील माने यांना फटका बसू शकतोे.

 

 

त्यामुळे कोल्हापुरातून संभाजी राजे आणि हातकणंगले मधून राजू शेट्टी हे महाआघाडीचे उमेदवार झाले तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यापुढे डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज