rajkiyalive

SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर

SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर : सोमवारी प्रवेशाची शक्यता : मिरजेच्या नेत्याचा पुढाकार

 

SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर

जनप्रवास : सांगली

सांगलीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला लागलेली गळती थांबायला तयार नाही. आता प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक अणि सांगलीचे माजी महापौर तथा शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी मिरजेच्या नेत्याचा पुढाकार असून, सोमवारी पक्षप्रवेशाची शक्यता आहे.

सुरेश पाटील यांच्या या भूमिकेमुळे हा जयंत पाटील यांना आणखी एक धक्का आहे.

माजी महापौर इद्रिस नायकवडी, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी फुटीनंतर लगेचच अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रवेश केला असून, भाजप नेते सुरेश आवटी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुमारे 14 आजी-माजी नगरसेवकांनी यापूर्वी अतिजदादा यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर सुरेश पाटील यांच्या या भूमिकेमुळे हा जयंत पाटील यांना आणखी एक धक्का आहे.

सुरेश पाटील यांनी महापौर म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.

सांगलीत जयंत पाटील यांच्या 2008 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमाातून मनपा क्षेत्रात थेट एंट्रीत अन्य आजी-माजी नगरसेवकांमध्ये सुरेश पाटील यांचाही पुढाकार होता. त्या माध्यमातून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तांतरही घडविले होते. परंतु मिरज पॅटर्नसह सत्तासंघर्षात अडीच वर्षेही जयंत पाटील यांना नेतृत्व गमवावे लागले होते.

दरम्यान, 2014 मध्ये सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सांगली विधानसभेची निवडणूक लढविली होती.

परंतु त्यांना अपयश आले होते. त्यानंतर आजपर्यंत ते जयंत पाटील यांच्यासमवेत पक्षात सक्रिय होते. परंतु पक्षांतर्गत गटबाजीतून डावलले जात असल्याबद्दल त्यांनी अनेकवेळा नाराजी बोलून दाखविली होती. आता यासह आणखी काही कारणांवरून त्यांनी अजितदादा पवार गटात सहभागी होण्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मिरजेच्या नेत्यांनी पुढाकार घेतला असून, त्यासंदर्भात नुकतीच चर्चा झाल्याचे समजते.

यानुसार सुरेश पाटील हे शरद पवार गटाचा राजिनामा देऊन सोमवारी अजितदादा पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत हा प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने जयंत पाटील यांचा आणखी एक मोहरा अजितदादा यांच्या गळाला लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज