rajkiyalive

CONGRESS SANGLI : काँग्रेसच्या दोन नेत्यांपैकी पहिला कोण गळाला?

CONGRESS SANGLI : काँग्रेसच्या दोन नेत्यांपैकी पहिला कोण गळाला? लोकसभेच्यादृष्टीने व्यूहरचना : यश मिळणार की प्रदेश भाजपाचा निशाणा चुकणार?

 

CONGRESS SANGLI : काँग्रेसच्या दोन नेत्यांपैकी पहिला कोण गळाला?

जनप्रवास : सांगली

पंतप्रधान मोदींच्या लोकसभा ‘मिशन 400 पार’साठी विरोधकांचे इनकमिंग सुरू आहे. याच राष्ट्रीय व्यूहरचनेचा पाया गिरवत प्रदेश भाजपाने सांगली जिल्ह्यातील दोन काँग्रेस नेत्यांवर निशाणा धरला आहे. साम, दाम, दंड, भेद या तत्वाचा अंमल करण्यास सुरूवात केली असल्याची चर्चा आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपर्क झाला असल्याचे समजते. अर्थात सर्व्हेतून सांगली लोकसभा मतदारसंघ धोक्यात असल्याने बेरजेसाठी ही व्यूहरचना सुरू आहे. यातून पहिल्यांदा कोण गळाला लागणार? की प्रदेश भाजपचा निशाणा चुकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

खासदार संजयकाका पाटील यांना अंतर्गत नाराजीतून यावेळी विरोध

गेल्या दोन टर्ममध्ये लाखांवर मताधिक्य असणार्‍या खासदार संजयकाका पाटील यांना अंतर्गत नाराजीतून यावेळी विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. यातील माजी आमदार विलासराव जगताप, सहयोगी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अनिलराव बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे संजयकाकांशी टोकाचे राजकीय वैरत्व निर्माण झाले आहे. त्यांनी संजयकाकांना थेट विरोधाची भूमिका भाजपच्या वरिष्ठ पातळीपर्यंत कळविली आहे. दुसरीकडे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज यांनी उमेदवारीचा दावा करीत थेट जिल्हाभर समांतर संपर्क यंत्रणा सुरू केली आहे. अशातून दोन्ही गटाकडून फुटीमुळे सांगलीची जागा धोक्यात असल्याचे भाजपच्या सर्व्हेतून पुढे आल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा

दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा झाली असून त्यांनी जिल्हाभर संपर्कमोहीम सुरू केली आहे. यात भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून मोदींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या दोन्ही युवानेते डॉ. विश्वजित कदम व विशाल पाटील यांना गळ लावला आहे. ते दोन्ही भाजपकडे वळले तर उमेदवारी बदल होवो न होवो. कोणालाही उमेदवारी मिळो, भाजपचा खासदार होणारच अशी आखणी सुरू आहे.

विशाल पाटील यांनी ज्येष्ठ भाजप नेते विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटूनही चर्चा केली होती.

याअंतर्गत मध्यंतरी विशाल पाटील यांनी ज्येष्ठ भाजप नेते विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटूनही चर्चा केली होती. सद्यस्थितीमध्येही राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपला बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजपचा आलेख थोडा चढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विशाल पाटील जरी यांनी जनसंपर्क सुरू ठेवला तरी अद्याप सावध भूमिका ठेवली आहे. दुसरीकडे डॉ. विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांना सी. बी. आय.ने आर्थिक गुन्ह्याचे आरोप ठेवून अटक केली आहे. त्यांची सुटका व्हायची असल्यास डॉ. विश्वजित कदम यांना भाजपाचे धोरण स्वीकारावे लागेल, असा भाजपकडून गळ आहे. ते भाजपामध्ये प्रवेश करतील असा कसाय राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे. वास्तविक अविनाश भोसलेंना बेकायदाच अटक असून, डॉ. विश्वजित यांना आपलेसे करण्यासाठीच हा डाव केला गेला असल्याचेही आरोप होत आहेत.

 

दुसरीकडे प्रदेश काँग्रेसकडूनही खबरदारी घेतली जात आहे.

यात सांगली जिल्ह्यात भाजपाने काँगेसला सुरूंग लावू नये, डॉ. विश्वजित कदमसारखा मातब्बर नेता भाजपाच्या गळाला लागू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे कळते. डॉ. विश्वजित कदम अद्याप भाजपाला सकारात्मक असल्याचे जाणवत आहे. तरी आपल्या सासर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपामध्ये जातीलही असा राजकीय व्होरा आहे.

विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत आणि दादा गटाची धुरा त्यांच्यावरच आहे.

काँग्रेसमध्येही आणि जनतेमध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडे वळविल्यास काँग्रेस उमेदवारीलाच खोडा घातल्यासारखे होईल, अशी भाजपची मनिषा आहे. एकूणच डॉ. विश्वजित कदम किंवा विशाल पाटील यापैकी एक नेता जरी भाजपाच्या गळाला लागला तरी भाजपमधील उमेदवारीचा वाद संपू शकेल. दुसरीकडे यातून विद्यमान भाजपा खासदार संजयकाका पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामुळे संजयकाकांवर आगामी काळात पुन्हा विधानसभा निवडणुकीत उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे बोलले जात आहे. एकंदर आता सांगली जिल्ह्यातील राजकीय चर्चा तापू लागली आहे, हे मात्र

 

नक्की.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज