rajkiyalive

JAYANT PATIL : विकासाचा महामेरू

जिल्ह्यासह राज्याच्या विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील. शेतातल्या मातीपासून ते टक्नोसॅव्हीपर्यंत, राजकारणापासून समाजकारण आणि आरोग्यापासून सर्वच क्षेत्रांवर निव्वळ कमांड नव्हे तर जनतेला त्यातून फायदा देण्याचे काम ते करतात. राज्याचा मुख्यमंत्री करू शकत नाही त्यापेक्षाही अधिक कृतीशील काम करणारे हे नेतृत्व म्हणजे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा विकासाचे महामेरू साहेबांचा आज (शुक्रवार) वाढदिवस. त्यानिमित्त…

 विकासाचा महामेरू

लोकेनेते स्व. राजारामबापू पाटील यांनी जनतेसाठी आयुष्य वेचले. त्यांच्यासारख्या सृजनश्रील नेतृत्वाकडून जयंत पाटील यांना बाळकडू मिळाले होते. त्यामुळे आपलं गाव, जिल्हा, राज्याच्या विकासाचा त्यांचा वसा साहजिकच जयंत पाटील यांनी पुढे जपला. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे 1984 साली अकाली निधन झाले, आणि साहेबांना अमेरिकेतील उच्च शिक्षण सोडून सार्वजनिक जीवनात यावे लागले. त्यांच्यावर अगदी तरुण वयात कारखान्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी येऊन पडली. त्यांनी वेळ देवून कारखान्याची प्रगती तर केलीच, मात्र त्यांनी गावोगावी पदयात्रा काढून कारखाना पुरस्कृत सहकारी पाणी पुरवठा योजना उभा केल्या, आणि वाळवा तालुक्यात आर्थिक क्रांती घडवून आणली. हे त्यांच्या आयुष्या तील सर्वात महत्वाचे काम आहे. मा. साहेबांनी अथक परिश्रमाने उभा केलेल्या पाणी पुरवठा संस्था या वाळवा तालव्याच्या प्रगतीचा मल स्रोत ठरल्या आहेत.

त्या आधारे पुढे राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष, वाळवा तालुक्याचा सप्तपदी आमदार आणि राज्याच्या मंत्रि मंडळातील अर्थ, गृह, ग्रामविकास व जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी पाहिली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जी-जी जबाबदारी मिळाली, ती-ती जबाबदारी त्यांनी स्वतःला झोकून देऊन प्रामाणिकपणे पार पाडली आहे, त्या संधीचे सोने केलेले आहे. हा आजच्या नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे.
ते गेल्या 38 वर्षापासून वाळवा तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. ते सप्तपदी आमदार आहेत. संपूर्ण राज्यात अस फार कमी विधानसभा मतदार संघ आहेत, वाळवा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास साहेब हे आपले कुटुंब प्रमुख वाटतात. समाजातील प्रत्येक घटकाला साहेब हे आपले वाटतात, हेच त्यांच्या यशाचे गमक असावे.

गावा-गावांच्या, मतदार संघाच्या तालुक्याच्या विकासाचा ध्यास त्यांना लागलेला असतो. वाळवा तालुक्यात प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, कोर्ट इमारत, उपजिल्हा रुग्णालय, गावागावातील शाळा, समाज मंदीर, मुख्य चौक व देऊळ, नदीवरील घाट, रेठरेहरणाक्ष पूल, मौजे डिग्रज- कसबे डिग्रज पूल, दुधगाव पूल, बोरगाव बंधारा, गावांना जोडणारे रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते अशी किती तरी कामे त्यांनी केली आहेत.

जयंत पाटील पहिल्यांदाच 1999 राज्याचे अर्थमंत्री बनले. त्यावेळी राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. त्यांनी यशस्वीपणे अनेक उपाय-योजना केल्या आणि राज्य दुरुस्त केले. सलग 10 अर्थ संकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नांवे असून त्यांनी राज्यात सर्व प्रथम सामाजिक न्यायाचा अर्थ संकल्प मांडलेला आहे. राज्यात 26/11 चा हल्ला झाला आणि आर आर आबांना गृहमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यावेळी मा. साहेबांच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी अगदी 9 महिन्यात पोलीस दल सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 5 वर्षे राज्याचे ग्राम विकास मंत्री ओढ सांभाळले. त्यांनी इको व्हिलेज सारखी गावा-गावांना समृद्ध करणारी योजना राज्यात राबविली. ग्राम पंचायत ना थेट निधी दिला, ग्राम पंचायतींच्या संगणकीकरण केले आणि गावोगावी श्रमदानातून कोट्यवधी झाडे लावली. त्यावेळी ग्रामविकास खात्याचा देशात सलग 3 वेळा प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी जल संपदा खात्याची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वीकारली आणि राज्यातील असंख्य मागे पडलेल्या पाणी योजनांना गती दिली आहे. कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित भागास पाणी देण्याचे नियोजन केलेले आहे.

त्यांनी स्मार्ट पीएसी, वाकुर्डे बुद्रुक योजना आणि जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावांना पाणी देण्याचे नियोजन आदी कामांचा समावेश आहे. दर्जेदार शिक्षण हे सध्या प्रगतीची गुरुकिल्ली बनले आहे. ही काळाची गरज ओळखून त्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा वाढविण्यासाठी जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून केवळ इमारती, शौचालये, पिण्याचे पाणी आदी सुविधा वाढविणे अपेक्षित नसून शैक्षणिक दर्जा वाढविणे हे मुख्य ध्येय आहे.
दवाखाना म्हटलं की सामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. प्रसंगी अनेकांचे उपचाराअभावी प्राण जात होते. हे लक्षात घेऊन त्यांनी अगदी खाजगी आरोग्य सेवेच्या तोडीस तोड आरोग्य सुविधा, तीही मोफत देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दोन्ही उपक्रमांना त्यांनी जिल्हा नियोजनमधून आर्थिक तरतूदही केलेली आहे. त्यामुळे ही कामे गतीने पूर्ण झाली आहेत. दुष्काळी जत भागातही पाणी योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री असताना मोठी कामे केली आहेत.

एकूणच विरोधकांच्या टीका-टिपण्णी पेक्षा विकासकामांना, सामान्य माणसाचे जीवन सुखी व समृध्द करण्यास प्राधान्य देतात. जे मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवून जनतेप्रती चांगली कामे करतात त्यांना ते साथ देतात. पण चुकीचे आणि जनतेच्या हिताविरोधात कोणी जात असेल तर त्यालाही संधी देतात. पण अगदी अति झाले तर नक्की ’करेक्ट कार्यक्रम’ हा ठरलेला.. अशा या कर्तृत्वान नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज