rajkiyalive

ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान

ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील 8 गावातील जनतेच्या आरोग्या साठी दीड महिना अथक काम केल्यानंतर युवा नेते व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी आता वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी ’समृध्द भूमी अभियान’हाती घेतले आहे.

 

ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान

बुधवार दि.21 फेब्रुवारीपासून ते वाळवा तालुक्याचा दौरा सुरू करीत आहेत. माती परीक्षण,जमिनीची जैविक सुपीकता सुधारणा,पाचट व पाचटाचे महत्व आणि सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली आदीबाबत प्रतिकदादा पाटील शेतकर्‍यांशी संवाद साधत चर्चा करणार आहेत. ’संकल्प कृषीक्रांतीचा, मातीच्या सुपीकतेचा’हे अभियानाचे घोषवाक्य आहे. बुधवार दि.21 रोजी सकाळी 10 वाजता बोरगाव येथे शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली असून या बैठकीमध्ये बोरगावसह बनेवाडी,मसुचीवाडी साटपेवाडी, जुनेखेड,नवेखेड येथील शेतकरीही सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता साखराळे येथे आयोजित बैठकीमध्ये साखराळेसह खरातवाडी,हुबालवाडी येथील शेतकरी सहभागी होणार आहेत.

गुरुवार दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नरसिंहपूर येथील बैठकीत नरसिंहपूर,शिरटे येथील शेतकरी सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी 6 वाजता तांबवे येथे आयोजित बैठकीत तांबवे,धोत्रे वाडी,येवलेवाडी येथील शेतकरी सहभागी होणार आहेत. शुक्रवार दि.23 रोजी सकाळी 10 वाजता नेर्ले येथे,तर सायंकाळी 6 वाजता कासेगाव येथे बैठक होणार आहे.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हे अभियान राबवित आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना राबविली जात आहे. यामध्ये एकरी 80 हजार रुपये खर्चापैकी शेतकर्‍यांनी रुपये 10 हजार भरायचे असून 70 हजार रुपयांचे अर्थसहाय्य अल्प प्रक्रियेत बँकांच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या दौर्‍यात शेतकर्‍यांना माहिती देताना त्यांचे मते जाणून घेतली जाणार आहे.

आ.जयंतराव पाटील यांनी पूर्वी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी चर खुदाईसारखा प्रकल्प राबविला आहे. त्यानंतर त्यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना वाळवा व मिरज तालुक्यातील काही गावात राज्य शासनाच्या वतीने 80-20 ही योजना आणली आहे.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्या चे उपाध्यक्ष विजयराव पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील आणि बँकांचे प्रतिनिधी या दौर्‍यात सहभागी होणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज