rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँगे्रस नेत्यांचे सूर जुळले; जागा निश्चित..

जनप्रवास,  शरद पवळ

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँगे्रस नेत्यांचे सूर जुळले; जागा निश्चित.. :सांगली लोकसभा मतदारसंघात महविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा जरी सुरू असला तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विशाल पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांनी एकदिलाने काम सुरू केले. नेत्यांचे सूर जुळल्याने मुंबई, दिल्ली पातळीवर नेते मंडळी देखील खूष झाले आहेत. त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसलाच ‘फायनल’ असल्याचे बोलले जात आहे.

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँगे्रस नेत्यांचे सूर जुळले; जागा निश्चित..

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व शिवसेना (उबाठा) मध्ये केवळ चर्चाच सुरू आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अद्याप मिटले नसल्याने जागा वाटपाचा तिढा वाढलेला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून देखील काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कोल्हापुरचमी जागा ही शिवसेनेची. पण या ठिकाणी शाहू महाराज निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. पण ते काँग्रेसच्या चिन्हावर. मग ही जागा काँग्रेस पक्षाने मागितली. शिवाय या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार देखील जास्त आहेत. शिवसेनेने सहजासहजी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेची गुगली टाकली. कोल्हापुरची जागा सोडतो पण सांगली द्या, अशी मागणी केली.

शिवसेनेच्या या मागणीमुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले.

2019 च्या निवडणुकीत असाच प्रकार झाला होता. जागा वाटप सुरू झाले आणि सांगली काँग्रेसचे नशिब फुटके निघाले, विशाल पाटील लोकसभेला इच्छूक होते, पण ही जागा गेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला. त्यामुळे ऐनवेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपयश आले. पण तीन लाखापर्यंतची मते त्यांनी घेतली. पुन्हा नव्या उभारीने कामाला लागले. पण आता पुन्हा मतदारसंघ सोडला जाणार की काय? याची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी नेत्यांची एकी नव्हती. त्याचा फायदा इतर पक्षाला झाला. ही चूक यावर्षी लक्षात घेऊन सर्व नेते एकत्र आले, ते आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले आहेत. विशाल पाटील यांनी प्रत्येक भाषणात आ. विश्वजीत कदमच आपले नेते असल्याचे सांगितले. या बरोबर जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी देखील विश्वजीत कदमांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यपातळीवर नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लाकेसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी सांगितले. विशाल पाटील यांनी देखील ही जागा काँग्रेसची आहे. आम्ही तयारी केली आहे. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणू, अशी ग्वाही देखील दिली.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा काँग्रेसची एकी पाहिली. प्रथमच सर्वजण एकत्र आल्याचे चित्र दिसले.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा सोडणार नाही, काँग्रेसच लढणार आहे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, मुंबईत थांबू नका, कामाला लागा असे स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाल्याचा स्पष्ट सिग्नल दिला. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते एकदिलाने सांगलीत काम करत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

मात्र गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी वसंतदादांच्या नातवांचा पराभव करून मदारसंघात भाजपचा झेंडा फडकवला आहे. पण आता काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या नेत्यांची एकी झाल्याने सर्व कार्यकर्त्यांना देखील समाधान वाटू लागले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह मिळत आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून विशाल पाटील सांगली मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना आपली उपस्थितीत दाखवत आहेत. मागील सहा महिन्यात त्यांनी जिल्हाभर दौरे सुरू केले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

त्यांच्या पत्नी पुजा पाटील यांनी देखील यांच्या प्रचारात असून मतदारसंघात खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत आहेत.

याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात झालेली काँग्रेस नेत्यांची एकी व प्रचारात विशाल पाटील यांना मिळत असल्याच्या प्रतिसादावरून राज्य व दिल्ली पातळीवर नेते मंडळी देखील खूष आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची हक्काची जागा आता काँग्रेस सोडणार नाही, असे बोलले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज