rajkiyalive

SANGLI LOKSABHA : काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून काही जण कार्यरत: कदमांचा आरोप

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून काही जण कार्यरत: कदमांचा आरोप : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळू नये, यासाठी काही जण कार्यरत आहेत, हे सर्वांना ज्ञात आहे. चंद्राहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. काँग्रेसलाच ही जागा मिळेल आणि मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते एकत्रित बसून निर्णय घेतील, असा इशारा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

SANGLI LOKSABHA : काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून काही जण कार्यरत: कदमांचा आरोप

दुष्काळी प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे. पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत. पण आम्ही उमदेवार ठरवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना देखील बोललो आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जागा काँग्रेसलाच राहील, असा शब्द दिला आहे.

सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

याबाबत विचारले असता आ. विश्वजीत कदम म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला आपआपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षात कोणाला घ्यावे कोणाला घेऊ नये हा ज्यांचा त्यांचा निर्णय आहे. मात्र जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा निर्णय अजून बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यास 2009 मध्ये जतमध्ये काँग्रेस विसर्जित करून विरोधी पक्षाचे काम करण्याचा पॅटर्न राबवला गेला तोच पुन्हा सांगली लोकसभेत राबवला जाईल, असे मत जिल्हाध्यक्षांनी मांडले होते.

त्यावर आ. कदम यांना विचारले असते ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे आ. कदम यांनी सांगितले. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार नाही. जर मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते एकत्रित बसून निर्णय घेतील, असा इशारा आ. विश्वजी कदम यांनी दिला.

झारीतील शुक्राचार्याचा प्रयत्न यशस्वी होईल: विशाल पाटील

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून पडद्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचा समाचार पक्षश्रेष्ठी येईल. पण आता जनतेतून आवाज येत आहे. जनता सगळ्या डावांना ओळखून आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. यावेळी काँग्रेस एकसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळेल, यात काही अडचण नाही. लोकसभेचे व्यासपीठ हे जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आहे. गेल्या दहा वर्षात सांगलीला स्वार्थी खासदार लाभले आहेत. ते केवळ स्वताची प्रापर्टी वाढविण्यात मग्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज