rajkiyalive

JAYSINGPUR : संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरभूषण पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर/ जनप्रवास
JAYSINGPUR : संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरभूषण पुरस्काराने सन्मानित : संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहराचा विकास साधला. त्याची दखल घेवून स्व.मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ट्रेड सिटीच्यावतीने त्यांना जयसिंगपूर भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे. हे सत्कार्याचे कौतुक स्तुत्य आहे. अशा कर्तुत्ववान नेतृत्वामुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाचे भविष्य मोठे आहे, असे प्रतिपादन वक्ते संजय कळमकर यांनी केले.

JAYSINGPUR : संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरभूषण पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर येथील स्व.मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ट्रेड सिटीच्यावतीने माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूर भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सहकार महर्षि स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी श्री कळमकर बोलत होते. सोहळ्यास माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रवि अदुकिया प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल नासिर बोरसादवाला होते.
यावेळी बोलताना संजय कळमकर पुढे म्हणाले, बदलत्या काळात मानवाने मोठी प्रगती केली. आजच्या काळात सर्व सुविधा आहेत मात्र माणूस आनंदी नाही. पुर्वीचे लोक चुकांमध्ये आनंद शोधत होते, मात्र आज माणूस आनंदामध्ये चुका शोधत आहे. म्हणून आपण दुःखी आहोत. मोबाईलमध्ये माणूस गुंतला आहे. आपण सर्वजण आभासी जगात जगत आहोत. जीवनातील आनंद हरवला आहे. तंत्रज्ञानात वाहत गेल्याने समाधान उरले नाही. संवेदना नष्ट झाल्या आहेत. इतरांकडून आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण आपली परंपरा, सनावळ्या नव्या पिढीकडे दिल्या पाहिजेत. दुसर्‍याला आनंद वाटला पाहिजे तरच आपणास आनंद मिळेल. कौटुबिक आरोग्य सुधारल्यास सामाजिक आरोग्य सुधारेल असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी वसविलेल्या जयसिंगपूर या आखीव रेखीव नगरीत नगरपालिकेकडे निधी नसल्याने नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नव्हत्या. मात्र आता  या शहरात सुसज्ज नाट्यगृह, अद्ययावत स्टेडियम, स्विमींग टँक, नगरपालिकेची सुसज्ज इमारत उभारली आहे. शहराच्या विकासात  माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा मोलाचा वाटा आहे. नवी पिढी कला, क्रीडा क्षेत्रात पारंगत व्हावी यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.जयसिंगपूर शहरातील नागरिकांना 24 तास पाणी देण्यात येणार आहे. भुयारी गटर योजनेच्या कामाची निवीदा निघाली आहे. हे काम लवकरच सुरू होईल.  महापालिका क्षेत्रात ज्या सुविधा मिळत नाहीत त्यापेक्षाही अधिक सुविधा जयसिंगपूर शहरातील नागरिकांना देण्याचे काम संजय पाटील यांनी केल्याचेही ते म्हणाले.
सत्कारमुर्ती संजय पाटील यड्रावकर म्हणाले, वडील स्व.शामरावआण्णा, आई सावित्रीआक्का, वडीलबंधू आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे सामर्थ्य मिळाले. सामाजिक जीवनात काम करीत असताना नागरिकांचे सहकार्य लाभले. म्हणूनच हा पुरस्कार मला मिळाला आहे.
मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. स्वागत रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष अभय बनजवाडे यांनी तर प्रास्ताविक चोरडिया ट्रस्टचे अध्यक्ष विनोद चोरडिया यांनी केले. मानपत्राचे वाचन सुभाष टाकळीकर यांनी केले. आभार विनेश खाडे यांनी मानले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील यड्रावकर, सौ.त्रिशला पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, अभिराज पाटील यड्रावकर, प्रकाश झेले, उद्योगपती विनोदभाऊ घोडावत, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, राजेश चोरडिया, सौ.मैनादेवी चोरडिया, महेंद्र सावंत, डॉ.पांडूरंग खटावकर, डॉ.अतिक पटेल, बजरंग खामकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज