rajkiyalive

SANGLI LOKSABHA : तुम्हाला मोदींना तर आम्हाला संजयकाकांना पराभूत करायचंय

जनप्रवास । कवठेमहांकाळ
SANGLI LOKSABHA : तुम्हाला मोदींना तर आम्हाला संजयकाकांना पराभूत करायचंय : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची शुक्रवारी दुपारी कवठेमहांकाळ येथील दुध संघाच्या कार्यालयात भेट झाली. या भेटीचा वृत्तांत समजू शकला नाही. खासदार राऊत यांनी घोरपडे यांच्या समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर राऊत व घोरपडे यांच्या भेटीला महत्व आहे.

SANGLI LOKSABHA : तुम्हाला मोदींना तर आम्हाला संजयकाकांना पराभूत करायचंय

अजितराव घोरपडेंची संजय राऊतांसमोर स्पष्टोक्ती

सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ऊबाठा गटाचे उमेदवार डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्राचारार्थ खासदार संजय राऊत यांचा सांगली लोकसभा मतदार संघात प्रचार व संपर्क दौरा शुक्रवारी होता. उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील कवठेमहांकाळ येथील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. आगमन होताच शिवसेनेच्या घोषणा देण्यात आल्या. कवठेमहांकाळ तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांच्यावतीने खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी सन 2019 मध्ये तासगांव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनकडून निवडणूक लढविली होती. पक्षप्रमूख ऊध्दव ठाकरे ,खासदार संजय राऊत व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे निकटचे संबंध आहेत. आजच्या भेटीची चर्चा समजू शकली नाही. सर्वानी स्नेहभोजन केले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या समवेत लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमूख प्रा.नितीन बाणुुगडे पाटील, जिल्हाप्रमूख संजय विभूते ; बजरंग पाटील, शिवसेनेचे तासगांव तालुकाप्रमुख प्रदीप माने -पाटील, कवठेमहांकाळ तालुका प्रमुख मारूती पवार, अनिल बाबर, परशुराम कारंडे ,तालुक्यातील विभाग प्रमुख आदींसह प्रमूख मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजितराव घोरपडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरेदी विक्री संघाचे चेअरमन ईश्वर पवार, तात्यासाहेक नलवडे,विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील,माजी चेअरमन दिलीपराव झुरे, पांडूरंग पाटील,बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज