rajkiyalive

अजित पवारांची धाकधूक वाढली,

अजित पवारांची धाकधूक वाढली, मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा 17 एप्रिल रोजी थंड होणार आहेत. त्यापूर्वी एबीपी न्यूजनं ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या सर्व्हेच्या अंदाजामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं समोर आलेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

अजित पवारांची धाकधूक वाढली,

एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजित पवारांनी 40 आमदारांना हाताशी धरत पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या पारड्यात टाकलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे. पण या निवडणुकीत अजित पवारांना जोरदार धक्का बसल्याचं दिसतेय. दुसरीकडे शरद पवार यांना चांगलं यश मिळत असल्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 4 जून रोजी नेमके चित्र स्पष्ट होणारच आहे. पण त्याआधी एबीपी- सी वोटर सर्वेच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल समोर आला आहे. मतदानपूर्व चाचण्यांत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शून्य जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपामध्ये अजित पवार यांच्या वाट्याला आतापर्यंत चार जागा आल्या आहेत. नाशिकच्या जागेवरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अजित पवारांनी बारामतीमधील ताकद वाढवण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडली आहे. पण त्याचाही अजित पवारांना फायदा होत नसल्याचं दिसतेय. कारण सर्व्हेच्या अंदाजानुसार, बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसतेय. सुनेत्रा पवार यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर –

बारामती लोकसभेची निवडणुक राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात आहे. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. याठिकाणी सुनेत्रा पवार पिछाडीवर दिसत आहेत. सर्व्हेचा हा अंदाज अजित पवार यांच्यासाठी धाकधूक वाढवणारी बाब आहे. बारामती लोकसभेसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी मोदींच्या विचाराचा खासदार निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बारामतीचे मतदार सुप्रिया सुळेंच्या बाजूने दिसत आहेत. अतिंम निकाल 4 जून रोजी समोर येईल.

शिरुरमध्ये आढळरावांना धक्का बसणार –

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महायुतीच्या जागावाटपात शिरुर मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला आला. अजित पवारांना आयात करण्यात आलेला उमेदवार द्यावा लागला. एबीपी न्यूजच्या सर्व्हेनुसार, शिरुरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार असल्याचं दिसत आहे. शिरुरमध्ये शरद पवार यांच्याकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव करत पहिल्यांदाच संसद गाठली होती. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विजयी होणार असल्याचं दिसतेय.

रायगडमध्ये सुनील तटकरेंवर परभावाचं सावट –

अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत आले होते. सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. सुनील तटकरे रायगडमधूल लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरले आहेत. त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. पण त्यांच्या पदरी निराशा पडू शकते, असा सर्व्हेचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनंत गिते मैदानात उतरले आहेत. सर्व्हेच्या प्राथमिक अंदाजानुसार, अनंत गिते यांचं पारडं जड दिसत आहे. पण हा फक्त ओपिनियन पोलचा अंदाज आहे, अंतिम निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

उस्मानाबादमध्ये ओमराजे बाजी मारणार –

अजित पवार यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही धक्का बसत असल्याचं सर्व्हेमध्ये दिसत आहे. जागावाटपामध्ये अजित पवार यांना उस्मानाबादची जागा मिळाली, या मतदारसंघातून त्यांनी अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले. अर्चना पाटील या या तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी आर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करुन तिकिट मिळवलं. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली. जोरदार प्रचार केला जातोय, भाजपकडूनही कंबर कसली जातेय. पण ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड असल्याचं प्राथमिक कलामधून स्पष्ट झालं आहे.

नाशिकमध्ये काय होणार ?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून जोरदार प्रचारदेखील केला जात आहे. पण दुसरीकडे महायुतीकडून अद्याप इथं उमेदवारचं जाहीर कऱण्यात आला नाही. नाशिकच्या जागेसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे इच्छूक आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून या जागेसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. नाशिकमध्ये महायुतीला विजय मिळेल, असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधील लढत अतिशय अटीतटीची होईल, असेही सर्व्हेत सांगण्यात आले. पण महायुतीमध्ये ही जागा कुणाला सुटणार? याचा तिढा कायम आहे. नाशिकमध्ये अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ इच्छूक असल्याचं समोर आले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज