rajkiyalive

खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू

खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये असणार्‍या अचानक चौक येथे पाच वर्षांच्या बालकाचा खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना हि आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. देवराज दगडू गवंडी (वय 5 वर्षे सहा महिने रा. समडोळी) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मृत देवराज गवंडी हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहत होता. आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवराज हा गावातील अचानक चौक येथे रस्त्यावर खेळत होता. यावेळी खेळताखेळता देवराज याचा हात विजेच्या खांबाला लागला. त्याला शॉक लागल्याने तो खाली कोसळला. यावेळी त्याठिकाणी असणार्‍या त्याचे चुलते संजय रामचंद्र गवंडी यांनी त्याला मृत अवस्थेतच सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी असणार्‍या डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेनं गवंडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

——————————-

सांगलीतील राजकीय प्रचार सभेत चोरट्यांचा डल्ला : 1 लाख 75 हजारांची सोन्याची गोप केली लंपास.

सांगली : शहरातील स्टेशन चौक येथे झालेल्या एका राजकीय प्रचार सभेत चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यातील 70 ग्रॅम वजनाची आणि 1 लाख 75 हजार रुपये किमतीची सोन्याची गोप अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली. सदर चोरीची घटना हि गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल विहार समोर घडली. या प्रकरणी गोविंद सदाशिव जाधव (वय 52 रा. चिंचणी) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहरातील स्टेशन चौक येथे काल गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी एका राजकीय पक्षाच्या लोकसभा प्रचाराची सभा होती. या सभेसाठी दोन उपमुख्यमंत्री आले होते. या सभेसाठी तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे राहणारे गोविंद जाधव हे देखील आले होते. सभेला गर्दी असल्याने ते स्टेशन चौक येथील हॉटेल विहार समोर थांबले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या गळ्यात असणारी 70 ग्रॅम वजनाची आणि 1 लाख 75 हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची गोप हातोहात लंपास करत चोरून पलायन केले. सभा संपल्यानंतर परत निघालेल्या जाधव यांच्या गळ्यात गोप नसल्याचे निदर्शनास आले.

यावेळी त्यांनी परिसरात शोध घेतला असता गोप कोठेही मिळून आली नाही. यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज