rajkiyalive

सत्यजित पाटील सरुडकर मतदारांशी नाळ कशी जोडणार?

जयसिंगपूर /अजित पवार
सत्यजित पाटील सरुडकर मतदारांशी नाळ कशी जोडणार? : लोकसभा निवडणूक रंगात आली आहे. यामुळे प्रत्येक उमेदवार प्रचारात आता आपापल्या पद्धतीने रंग भरू लागला आहे. पक्षाच्या कामामुळे आपण कोठे आहोत. याचबरोबर दुसर्‍या उमेदवाराचे हेवे देवे प्रत्येक जण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर आपला पूर्वाश्रमीचा पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदार संघ वगळता अन्य मतदार संघात मतदारांशी नाळ जोडू शकतात का? हे मात्र आता पहावे लागणार आहे.

सत्यजित पाटील सरुडकर मतदारांशी नाळ कशी जोडणार?

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून हातकलंगले लोकसभा मतदारसंघात महायुती भाजप शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडी उबाठा गटाचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन विकास आघाडीचे दादासाहेब उर्फ डी. सी. पाटील यांच्यासह पक्ष संघटनांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचे, संघटनेचे अथवा आपले मत जनतेसमोर मांडत आहे. आपण जनतेला काय देऊ शकतो हेही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

विद्यमान खासदार धैर्यशील माने हे मतदार संघात 8200 कोटी रुपयाची विकास कामे त्याचबरोबर शिवसेना भाजपची कार्य जनतेसमोर मांडताना दिसत आहेत. तसेच आपले मत विकासाला आणि मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी देत असल्याचे आपल्या प्रचारादरम्यान सांगत आहेत. आपकी बार 400 पार असा नारा मोदी यांनी दिला असल्याचे सांगत यावेळी मला पुन्हा संधी द्यावी असे ते मतदारांसमोर आपले म्हणणे मांडत आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विभागातून दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले आहेत.

शेतकर्‍यांची चळवळ मोठी झाली पाहिजे, उसाला हमीभाव त्याचबरोबर अन्य पिकांनाही हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा लढा आहे. शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्नाबाबत ते सरकारला घेरत आहेत. जयसिंगपूर येथे प्रतिवर्षी होणार्‍या ऊस परिषदेत ते आपल्या प्रभावशाली भाषणातून ऊसाला यावर्षी प्रतिटन किती भाव घ्यायचा याबाबत सरकारला घेरत आहेत. हाच मुद्दा घेऊन ते जनतेसमोर गेले आहेत.

 उबाठा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर हे शाहुवाडी पन्हाळा मतदार संघाचे माजी आमदार आहेत.

राजकीय सत्ता बदलात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांच्या पन्हाळा शाहूवाडी मतदार संघा व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी नाळ जोडली आहे. पण उर्वरित शिरोळ, इचलकरंजी, हातकलंगले, सांगली जिल्ह्यातील वाळवा या चार तालुक्यात ते आपली मशाल कशी पेटवू शकणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या चार तालुक्यातील जनतेची त्यांचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही तरीही केवळ नेत्यांना समोर ठेवून ते या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बाहुबली (ता. हातकलंगले) येथील बहुबली विद्यापीठाचे ते संचालक आहेत.

इतक्याच कामाची पावती त्यांच्या पाठीशी आहे. पण त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्यावर असलेला विश्वास यावरच ते मताची शिदोरी जनतेकडे मागत आहेत.एकंदरीतच सारासार विचार केला तर हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील वातावरण सध्या तापले आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजित आबा पाटील सरूडकर हे कसे जनतेसमोर जाणार. आणि ते जनतेशी नाळ जोडू शकतात का? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज