जत:प्रतिनिधि :
विशाल पाटील याना तिकीट मिळू नये यामागचे खलनायक जयंत पाटीलच- विलासराव जगताप : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतदादा पाटील हे तिकीट देण्यासाठी खिशात घेऊन फिरत असत. मात्र त्यांचे नातू विशाल पाटील यांना तिकीट मागण्यासाठी दिल्ली, मुंबई, नागपूर, ही वारी करावी लागते. काँग्रेसमध्ये चालय तरी काय? विशाल पाटील यांना तिकीट मिळ यामागचे खरे खलनायक माजी मंत्री जयंत पाटीलच असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत केला.
विशाल पाटील याना तिकीट मिळू नये यामागचे खलनायक जयंत पाटीलच- विलासराव जगताप
यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील,संग्राम जगताप, प्रमोद सांवत, राजू डफळे ,लक्ष्मण बोराडे ,कुंडलिक दुधाळ, अण्णा भिसे,राजु चौगुले, आनंदराव पाटील , बी आर पाटील ,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी तिकीट मागत नाही. मात्र काँग्रेस तिकीट मागत असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना हाताशी धरून विशाल पाटील यांचे तिकीट कापण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ज्यावेळी खासदार संजय राऊत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं जर खासदार संजय पाटील यांना पाडायचे असेल तर यांना विशाल पाटील यांना उमेदवारी द्या. जिल्ह्यात तुमचे ग्रामपंचायत नाही ,चंद्रावर पाटील हे चालणार नाही. असे स्पष्ट त्यांना सांगितलं होतं.
चंद्रहार पाटील यांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या ऐकुन खासदार संजय राऊत यांनी उमेदवारि दिली.
जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्याचे काम केले .पूर्वीच्या काळी वसंतदादा गट व बापू गट हे दोन गट होते .मात्र एकमेकाची संपवण्याचे अशी खुनशी वृत्ती नव्हती. आताच्या पिढीतील लोक राजकारणातून संपवण्याची वृत्ती ठेवत असून ही वाईट आहे. अशा प्रवृत्तीला वेळेस आळा घालण्याची गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात घाणेरडे राजकारण सुरू आहे .आम्ही दुष्काळी फोरम चे लोक एकत्र आलो असून काही लोकांना पक्षाचे अडचण असल्यामुळे ते ओपन येऊ शकत नाहीत.
.सध्या देश हुकुमशाही कडे चालू
तेही आमच्यावर असल्याचे आमदार विलासराव जगताप म्हणाले .सध्या देश हुकुमशाही कडे चालू असून. एकीकडे भाजप पक्ष महिलांचा सन्मान करतात असे सांगतात. मात्र नवीन लोकसभेच्या इमारती उद्घाटन सोहळा व राम मंदिर च्या सोहळ्याला देशाचे प्रथम नागरिक द्रोपती मुरमु यांना आमंत्रण दिले जात नाही. ते मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना डावले जाते का? हाच भाजपचा स्त्री बद्दलचा सन्मान आहे का असा सवाल माजी आमदार विलासराव जगताप करत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाही असून आज ईडि, सीबी ची भीती दाखवून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. इंदिरा गांधीच्या काळात खुली आणीबाणी होती मात्र आता थेट आणीबाणी सुरू असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यांना कवलापुर च्या विमानतळाचा प्रश्न त्यांना सोडत आला नाही.
तर खासदार संजय काका पाटील यांच्यावर हल्लाबोल करत दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यांना कवलापुर च्या विमानतळाचा प्रश्न त्यांना सोडत आला नाही. ड्रॅगन फूड चा प्रश्न मार्गी लावता आला नाही. सिंचन योजनेसाठी त्यांना निधी आणताना आला नाही. ह्या पाच वर्षात खासदार संजय काका पाटील याच्यां संपत्तीत 29 कोटी ने वाढ झाली असून. केवळ संपत्ती वाढवण्यातच त्यांनी आपली खासदारकी घालवली असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप करत. दमदाटी करून जमिनी मिळवणे हा एकमेव उद्योग त्यांनी केला असल्याचा आरोप केला.
खासदार संजय काका पाटील यांना हिंदी येत नसल्यामुळे ते बोले नसतील
खासदार संजय काका पाटील यांनी लोकसभेत किती वेळा बोलले लोकसभेत बोलायला हिंदी यावे लागते खासदार संजय काका पाटील यांना हिंदी येत नसल्यामुळे ते बोले नसतील असा खोचक टोला जगताप यांनी लगावत आम्ही ज्यावेळी रास्ता रोको आंदोलन, सर्वपक्षीय बैठक घेऊन केलो त्यावेळी सिंचन योजनेला निधी आला. फुकटचे श्रेय खासदार संजय काका पाटील यानी घेऊ नये. ज्यावेळी रस्ता रोको होता त्यावेळी खासदार संजय काका पाटील कुठे गेले होते. असा सवाल विलासराव जगताप यांनी केला .संजय काका पाटील हे मान हलवतात होय म्हणतात की नाही म्हणतात हेच कळत नाही असं म्हणतात एका सशा उडाला.
माझ्यावर हल्ला करणारे गुंड हे संजय काका पाटील यांनी पोसलेले गुंडच होते.
माझ्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी संजय काका पाटील यांची भेट घेतली. आता वयानुसार आम्ही कमजोर असून. जर पूर्वीचा जगताप असलो असतो तर हात पाय मोडून ठेवला असतो. दमदाटी करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा जशास तसे इशारा उत्तर देऊ असा इशारा जगताप यांनी देत .तुम्ही पावलेल्या कुत्र्याना अवरा लोकशाही पद्धतीने निवडणूक सुरू असून शांततेने निवडणूक चालू द्या असे माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याच्या आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.
मान हलवणार जनावर दावणीला बांधत नाहीत:माजी आमदार जगताप
मान हलवणार जनावर दावणीला बांधत नसतात त्याचा बाजार करायचा असतो .त्या प्रमाणे या निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांचा पराभव करा असा हल्लाबोल माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
माझ्या पाया पडून पदे घेतली:
मी विधानसभा निवडणुकीत पराभव झालो तरी कुठल्याही मंत्र्याकडे मला पद द्या म्हणून मी पाया पडायला गेलो नाही. जनता हेच माझे पद असून .पण काहीजण माझे पाया पडून पदे घेतले. आज माझ्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यांची जागा योग्यवेळी त्यांना दाखवू असे जिम बँकेचें संचालक प्रकाश जमदाडे यांचे नाव न घेता माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्याना टोला लगावला.
वसंतदादा घराण संपवण्याचा घाट जयंत पाटील यानी घेतलय:
जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा घरांण संपवण्याचे घाट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतले असून. त्यासाठी पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादाचे नातू विशाल पाटील यांचे नेतृत्व उभराहण गरजेचे असल्याचे मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले.विशाल पाटील यांच्या पाठीशी जिल्ह्याने उभे राहावे असे आव्हान माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



