rajkiyalive

वंचित आघाडीला कोणीही हलक्यात घेवू नये

वंचित आघाडीला कोणीही हलक्यात घेवू नये : माझी उमेदवारी कुणाला पाडायला किंवा कुणाला जिंकायला भरली नाही. समाजातील दीन दलित, गोर गरीब, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी रिंगणात उभा आहे. मला मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे वंचित आघाडीला कुणीही हलक्यात घेवू नये, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी केले.

 

वंचित आघाडीला कोणीही हलक्यात घेवू नये

हातकणंगले लोकसभा प्रचाराला शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत आली असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी वडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि दिव्य प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी ते बोल होते.

आघाडीच्या माध्यमातून विजयी होण्यासाठी निवडणूक रिंगणात उभा राहिलो आहे

ते म्हणाले, मी कोणाची मते खाण्यासाठी उभा राहिलो नसून वंचित आघाडीच्या माध्यमातून विजयी होण्यासाठी निवडणूक रिंगणात उभा राहिलो आहे, आम्ही सर्व सामान्य जनतेच्या मनात आता आजी, माजी खासदार बदल तिरस्कार निर्माण झाला आहे.एक निवडून आल्यापासून आला नाही आणि एक पडल्यापासून आला नाही, अशी विचारसरणी मतदाराचा मनात तयार झाली असून. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून विविध विकासकामे प्रलंबित असल्याचे लक्षात आले आहे.

इचलकरंजी, वडगाव प्रश्न त्यांनी मिटवले असते तर आज त्यांच्यावर दारोदारी फिरण्याची वेळ आली नसती.

सध्या काही उमेदवार वेगवेगळ्या शहरांना पाणी प्रश्न मिटवण्याचे आश्वासन देत आहेत त्यांना स्वतःच्या भागातील पाणी प्रश्न मात्र मिटवता आला नाही, ते जनता इचलकरंजी, वडगाव प्रश्न त्यांनी मिटवले असते तर आज त्यांच्यावर दारोदारी फिरण्याची वेळ आली नसती. परिणामी गटातटाच्या राजकारणात फक्त वंचितांचा मतासाठी वापर करायचा व त्यांचे मतदान झाल्यानंतर त्यांचा वार्‍यावर सोडायचे काम सतत महाविकास आघाडी व भाजपने केले आहे परिणामी आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्ता एकाकी पडणार नाही,

त्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी न्याय मिळेल. परिणामी बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रेशर कुकरला प्रचंड मतांनी निवडून देऊन देशाचे नेतृत्व करणार्‍या लोकसभेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला उत्तुंग भरारी देण्यासाठी हातकणंगलेचा खासदार निवडून द्या असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी केले.

मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलेल्या 420 कोटीच्या विकासकामांच्या जोरावर मतदान मागणार आहे .

ते पुढे म्हणाले, मी कोणावर टीका करणार नाही, मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलेल्या 420 कोटीच्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्य जनतेशी माझा असणार्‍या संपर्कावर मतदान मागणार आहे .त्यासाठी मला बहुजन वंचित आघाडीचे मोठे सहकार्य लाभले आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी मतदार संघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. गेले वीस वर्षे राजकारण करत असताना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून मी निवडणुका लढवल्या परंतु सर्वच राजकीय पक्षांनी माझ्याकडे कायम दुर्लक्ष केले.

मतदारसंघातील सर्व जनतेने, एकत्रित येऊन मला विजयी करावे

डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांची जन्मभूमी असणार्‍या कुंभोज गावला हातकणंगले लोकसभेची उमेदवारी तीही जैन समाजातील एका अल्पसंख्यांक माझ्यासारख्या माणसाला देऊन बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुंभोज व परिसरावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मतदारसंघातील सर्व जनतेने, एकत्रित येऊन मला विजयी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर ट्रक चालवणारा ड्रायव्हर या मतदारसंघाचा खासदार का होऊ शकत नाही हे ब्रीदवाक्य घेऊन बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली उमेदवारी व माझ्या कामाची केलेली पाहणी पाहता मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर नक्कीच माझा विजय निश्चित असल्याचे मत ही यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डी.सी. पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज