rajkiyalive

लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार?

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार? : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शेवटचे केवळ पाच दिवसचर राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील एक चुरशीची लढत हातकणंगले लोकसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. कधी नव्हे ती चौरंगी लढत येथे होत आहे. शिवसेेेेेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे राजू शेट्टी, उबाठाचे सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित आघाडीचे डि. सी. पाटील चौघांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

सवार्र्चे लक्ष आहे ते शाहूवाडी, इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघावर. कारण या तिन्ही मतदार संघांनी विजयी उमेदवारांना कायमच लाखाच्यावर मते दिली होती. त्यावेळी दुरंगी लढत होती. यंदाच्या निवडणुकीतही ही परंपरा कायम राहणार काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

2009  निवडणुकीत राजू शेट्ट्ी यांना हातकणंगले विधानसभा मतदार संघात 98 हजार 702 मते 

2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्ट्ी यांना हातकणंगले विधानसभा मतदार संघात सुमारे 98 हजार 702 मते मिळाली म्हणजे जवळपास लाखभर मते मिळाली. निवेदिता माने यांना 58 हजार 783 मते मिळाली. येथे सुमारे 39 हजार 919 मते राजू शेट्टींना जास्तीची मिळाली.

2014  निवडणुकीत राजू शेट्टींनी  शाहूवाडी विधानसभा मतदार संघात 1 लाख 6 हजार 193 मते
हातकणंगले विधानसभा मतदार संघांने शेट्टींच्या पदरात 1 लाख 27 हजार 50 मते
इचलकरंजी मतदार संघात राजू शेट्टी यांना 97 हजार 691 मते मिळाली.

2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजप आघाडीत जाणे पसंत केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांना उतरवले. त्याचा त्यांना फायदाच झाला. शाहूवाडी विधानसभा मतदार संघात राज्ाू शेट्टी यांना 1 लाख 6 हजार 193 मते मिळाली तर विरोधी आवाडेंना 63213 मते मिळाली. 42 हजार 980 मताचे मताधिक्य शेेट्टींना मिळाली. हातकणंगले विधानसभा मतदार संघांने शेट्टींच्या पदरात 1 लाख 27 हजार 50 मते टाकली. तर विरोधी आवाडेंना केवळ 78 हजार 918 मते मिळाली. येथे सुमारे 48 हजार 132 मते मिळाली. इचलकरंजी मतदार संघात राजू शेट्टी यांना 97 हजार 691 मते मिळाली. यावेळी राजू शेट्टींना जवळपास लाखभर मते मिळाली. तर होम ग्राउंड असूनही आवाडेंना 77 हजार 879 मते मिळाली. 19 हजार 812 मते शेट्टींना जास्त मिळाली.

2019 च्या निवडणुकीत शाहूवाडी मतदार संघात धैर्यशील मानेंना 94 हजार 200 मते मिळाली
हातकणंगले विधानसभा मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 18 हजार 683 मते मिळाली
इचलकरंजी मतदार संघात धैर्यशील माने यांना विक्रमी 1 लाख 24 हजार 837 मते मिळाली

2019 च्या निवडणुकीत शाहूवाडी मतदार संघात धैर्यशील मानेंना 94 हजार 200 मते मिळाली म्हणजे जवळपास लाखभर मते मिळाली. तर राजू शेट्टींना 72 हजार 457 मते मिळाली. 21 हजार 743 मते धैर्यशील माने यांना जास्तीची मिळाली. हातकणंगले विधानसभा मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 18 हजार 683 मते मिळाली तर राजू शेट्टी यांना 73 हजार 221 मते मिळाली. सुमारे 45 हजार467 मताचे मताधिक्य मानेंना मिळाले. इचलकरंजी मतदार संघात धैर्यशील माने यांना विक्रमी 1 लाख 24 हजार 837 मते मिळाली तर राजू शेट्टींना केवळ 49 हजार 907 मते मिळाली. 74 हजार 930 मताचे मताधिक्य केवळ इचलकरंजीतून धैर्यशील मानेंना मिळाले.

गेल्या तीन वेळच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता शाहूवाडी, इचलकरंजी आणि हातकणंगले या तीन विधानसभा मतदार संघ कायमच लाखाच्या आसपास विजयी उमेदवारांना मते दिली आहेत. यंदाच्या निवडणुकीतही शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी विधासभा मतदार संघात लाखावर मते मिळतात काय हेच पहावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज