rajkiyalive

शेतकर्‍यांना लुटणार्‍या साखर सम्राटांना रोखा : महेश खराडे

 शिवरायांना अभिवादन करुन प्रचार सांगता

जनप्रवास । प्रतिनिधी
शेतकर्‍यांना लुटणार्‍या साखर सम्राटांना रोखा : महेश खराडे : सांगली ः जिल्ह्यातील शेतकर्‍यांना साखर कारखानदारांनी वर्षानुवर्षे लुटले आहे. आता मतदार राजाने लोकसभेच्या निवडणुकीत साखर सम्राटांना रोखावे, असे आवाहन स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांनी केले.

शेतकर्‍यांना लुटणार्‍या साखर सम्राटांना रोखा : महेश खराडे

स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांच्या प्रचाराची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालून अनोख्या पद्धतीने झाली. लुटारू साखर सम्राटा पुढे लाचार होणार्‍या मतदार राजाला स्वाभिमानाने मतदान करण्याची वृत्ती अंगी बाणव असे साकडे घालून ही सांगता केली.
यावेळी खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदार गुलाम झाला आहे. स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकर्‍यांना लुटणार्‍या साखर सम्राटच्या आहारी गेला आहे. त्यामुळे गुलाम झालेल्या मतदारांना स्वाभिमानाने मतदान करण्यास शिकव, असे साकडे आम्ही घालून प्रचाराची सांगता केली.

रविवारी पहाटे चार वाजता शहरातील विक्रेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यानंतर कृष्णा नदीवर पोहण्यासाठी येणार्‍या सर्वाना शिट्टी ला मतदान करण्याचे आवाहन केले बापट मळा व आमराई येथील वॉकर ग्रुप सदस्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी अकरा वाजता गणपतीचे दर्शन घेऊन गणपती पेठ, कापडपेठ, टिळक चौकातून हरभट रोड मार्गे मारुती चौकातून पदयात्रा काढण्यात आली. सर्व व्यवसायिकांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुस्पहार घालून अभिवादन घालून साकडे घालण्यात आले. यावेळी अजित हल्लिंगले, डॉ जयपाल चौगुले, लक्ष्मण यादव, सुरेश पश्चिबरें, आम्रपाली कदम आदि उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज