rajkiyalive

सांगली पेठ रस्त्यावर दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड

जनप्रवास । सांगली
सांगली पेठ रस्त्यावर दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. एका बाजुने काँक्रीटीकरणाचे रस्ते केले आहेत. दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सांगली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे सांगलीतील हळद, बेदाणे, द्राक्ष आदी शेतीमालाला चालना मिळणार आहे. एमआयडीसीमधील उद्योगधंद्यांना देखील चालना मिळणार आहे.

सांगली पेठ रस्त्यावर दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड

पुणे-बेंगलोर, रत्नागिरी-नागपूर, विजापूर-गुहागर असे अनेक महामार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. मात्र सांगली राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्ट झाली नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली नाही. नव्याने उद्योगधंदे देखील आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाशी सांगली जोडणे आवश्यक आहे. सांगली-पेठ रस्ता हा चारपदरी होणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मागणी रेटली होती. सांगलीतून पेठला पोहचण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. पावसाळ्यात या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडत होते.

या रस्त्याच्या कामासाठी 860 कोटींचा निधी मंजूर केला.

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले, अनेकांचे बळी देखील गेले. या रस्त्याविरोधात आंदोलन झाले की तात्पुरती मलमपट्टी म्हणून पॅचवर्क केले जात होते. अनेक आंदोलने झाली. त्याची दखल घेत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्यावर्षी या रस्त्याच्या कामासाठी 860 कोटींचा निधी मंजूर केला. 860 कोटींची निविदा राजस्थानच्या आरएसबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 48 टक्के कमी दराने भरली होती. त्यांना हे काम मंजूर झाले आहे. प्रत्यक्षात आता कामाला सुरूवात झाली आहे.

हे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने लवकरच एका बाजुने हे काम पूर्ण होणार आहे.

सांगली ते आष्टापर्यंत एका बाजुने काँक्रीटरणाचे काम सुरू आहे. हे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने लवकरच एका बाजुने हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या बाजुचे काम हाती घेण्यात येणार आहे. छोटेमोले पूल देखील आहेत. त्याचे काम सुरू आहे. दुजाभजकसह हा रस्ता लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. साधारण दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सांगली-पेठ अंतर 30 ते 40 मिनिटात शक्य होणार आहे.

त्यामुळे वाहतूक जलद व इंधन खर्चात देखील बचत होणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग शेतीवर आधारीत व्यवसाय तसेच एमआयडीसीमधील व्यवसायिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. महामार्ग सभोवतालचा परिसर व शहराच्या विकास व परिसराला चालना मिळणार आहे.

असा आहे सांगली- पेठ रस्ता
* सांगलीवाडी ते पेठ 41 किलोमिटरचा काँक्रीटीकरण रस्ता
* रस्त्यासाठी 860 कोटी मंजूर
* रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक
* 14 कि.मी. काँक्रीट गटार तर 27 कि.मी.ची दोन्ही बाजुस खुली गटार
* दहा छोटे पुल, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड
* दहा मोठे तर 34 लहान जंक्शन

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज