rajkiyalive

हातकणंगले विधानसभेतील अडीच लाख मताची वाटणी कशी होणार?

दिनेशकुमार ऐतवडे
हातकणंगले विधानसभेतील अडीच लाख मताची वाटणी कशी होणार? : हातकणंगले लोकसभा मतदार संघांची निवडणूक अखेर पडली. सर्व विधानसभा मतदार संघांची आकडेवाडी समोर आली असून, सर्वात मोठा असणारा हातकणंगले विधानसभा मतदार संघात 3 लाख 31 हजार 681 मातदारांपैकी 2 लाख 49 हजार 820 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता यामध्ये वाटणी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हातकणंगले विधानसभेतील अडीच लाख मताची वाटणी कशी होणार?

हातकणंगले विधानसभेतील अडीच लाख मताची वाटणी कशी होणार? : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सहा विधासभा मतदार संघापैकी हातकणंगले विधानसभा मतदार संघ सर्वात मोठा आहे. यामध्ये पुरुष मतदार 169655 असून, महिला 162008 मतदार आहेत. इतर 18 असे एकूण 3 लाख 31 हजार 681 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदार पुरुष 1 लाख 33 हजार 523 तर महिला 1 लाख 16 हजार 288 व इतर 9 असे एकूण 2 लाख 49 हजार 820 मतदारांनी हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष 78.7 टक्के, महिला 71.8 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 75.32 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

आता या सुमारे अडीच लाख मतदानापैकी धैर्यशील माने, राजू शेर्ट्टीं, सत्यजित पाटील सरूडकर आणि डि. सी. पाटील यांची वाटणी कशी होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्ट्ी यांना हातकणंगले विधानसभा मतदार संघात सुमारे 98 हजार 702 मते मिळाली म्हणजे जवळपास लाखभर मते मिळाली. निवेदिता माने यांना 58 हजार 783 मते मिळाली. येथे सुमारे 39 हजार 919 मते राजू शेट्टींना जास्तीची मिळाली.

2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींनी भाजप आघाडीत जाणे पसंत केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांना उतरवले. शेट्टींच्या पदरात 1 लाख 27 हजार 50 मते टाकली. तर विरोधी आवाडेंना केवळ 78 हजार 918 मते मिळाली. येथे सुमारे 48 हजार 132 मते मिळाली.

2019 च्या निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदार संघात धैर्यशील मानेंना 1 लाख 18 हजार 683 मते मिळाली तर राजू शेट्टी यांना 73 हजार 221 मते मिळाली. सुमारे 45 हजार 467 मताचे मताधिक्य मानेंना मिळाले.
यंदा चौरंगी लढत आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे. त्यामुळे येथे वंचितही जोरात चालणार आहे. वंचितचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी प्रचारातही आघाडी घेतली होती. त्यामुळे या मतदार संघात वंचित भरपूर मते घेेेेेईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेर्ट्टींंना या मतदार संघांने कायमच हात दिले आहे.

यंदाही तीच परिस्थती राहते की नाही हे 4 जूनला कळेल. धैर्यशील मानेंना गेल्या निवडणुकीत लाखाच्यावर मते मिळाली होती. या मतदार संघांत विनय कोरे यांचाही मोठा गट आहे. महाडिक पॅटर्नही येथे जोरदार चालतो.

या मतदार संघात धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

यंदा शिवसेना उबाठाचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासाठी येथे आ. राजू आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी कंबर कसली होती. त्याचा त्यांना कितपत फायदा होणार याकडेही लक्ष लागले आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघात वडगाव, रूई, हुपरी, आदी मोठी गावे आहेत. येथे शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात असल्याने शे्ट्टींचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. पण लीड किती मिळणार यासाठी 4 जूनची वाट पहावी लागणार आहे. या मतदार संघात धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज