rajkiyalive

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा

शेतकर्‍यांची चिंता वाढली, जादा दराने खतांची विक्री नको

जनप्रवास । प्रतिनिधी
खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा : सांगली ः निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चचार्ंना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा जिल्ह्यात पसरली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असताना खतांच्या दरवाढीच्या चर्चेने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तर शेतकर्‍यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

खरिपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीची अफवा

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर घमासान चर्चा होत आहे. कृषी निविष्ठांवरील खर्च वाढल्याचाही मुद्दाही सतत उपस्थित होत आहे. त्याचे निमित्त साधत ’ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खते महागली आहेत’ अशी जोरदार अफवा जिल्ह्यात पसरली आहे. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. 10:26:26 खताच्या 50 किलोच्या गोणीचे दर 1470 रुपयांऐवजी 1700 रुपये, 24:24:0:0 श्रेणीचे दर 1550 रुपयांऐवजी 1700 रुपये 20:20:0:0 ची किंमत 1250 रुपयांऐवजी 1450 रुपये तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत 500 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

राज्यात कोणत्याही कंपनीने खतांची दरवाढ केलेली नाही. शहरालगतच्या शेतकर्‍यांना ही अफवा असल्याचे पटले. परंतु दुर्गम व ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना या अफवेचा फटका बसू शकतो.

मुळात, केंद्र शासनाने अन्नद्रव्य आधारित अनुदान अलीकडेच जाहीर केले आहे. त्यानुसार खत निर्मिती कंपन्या आपापल्या उत्पादनाचा निर्मिती खर्च आणि किमतीचे पुढील किमान सहा महिन्यांचे नियोजन करीत आहे. त्यामुळे मध्येच खताची दरवाढ होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाचे दर अचानक वाढल्यास कंपन्यांना खतांच्या किमतीचा आढावा घ्यावा लागतो. मात्र त्यासाठी देखील केंद्राची परवानगी घ्यावी लागते.

संयुक्त खतांच्या दरात वाढ झालेली नाही.

दरम्यान, कृषी विभागात खत दरवाढीची अफवा धडकताच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्‍यांनी खत कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यात कोणतीही दरवाढ झालेली नसून उलट आरसीएफ कंपनीच्या एका श्रेणीची किंमत कमी झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. संयुक्त खतांच्या दरात वाढ झालेली नाही. उलट 20:20:0:13 खताची नव्या पुरवठ्याची किंमत 1300 रुपयांऐवजी 1250 रुपये झाली आहे. त्यामुळे या श्रेणीचे नवे खत शेतकर्‍यांना प्रतिगोणी 50 रुपये कमी दराने मिळणार आहे.

एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री झाल्यास कारवाई

खत उद्योगाकडून खात्री करण्यात आली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत. विक्रेत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ’एमआरपी’पेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज