rajkiyalive

SANGLI : मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रुममध्ये अलार्म, प्रशासनाची तारांबळ

पावसाच्या पाण्याचे थेंब पॅनेलमध्ये गेल्याने आवाज, उमेदवार, प्रतिनिधींकडून पाहणी

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रुममध्ये अलार्म, प्रशासनाची तारांबळ : सांगली ः अवकाळी पावसामुळे पाण्याचे थेंब फायर अलार्ममध्ये गेल्याने फॉल्स अलार्म वाजू लागल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर तात्काळ स्ट्रॉग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. फायर अलार्म सिस्टीममध्ये फाल्स फायर अलार्म वाजल्याचे दिसून आले. अलार्म हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याने वाजल्याने अलार्म बंद करण्यात आला. दरम्यान रविवारी सकाळी लोकसभेचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून पाहणी करण्यात आली.

SANGLI : मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रुममध्ये अलार्म, प्रशासनाची तारांबळ

लोकसभा मतदारसंघासाठी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे दोन प्रकारच्या स्वतंत्र स्ट्रॉग रूम करण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री अलार्म वाजल्याने स्ट्रॉग रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवार यांना संपर्क करण्यात आला. रविवारी सकाळी उमेदवार सुवर्णा गायकवाड, नानासो बंडगर व उमेदवार प्रतिनिधी संदीप पाटील, गजानन साळुंखे, आनंद रजपूत, दत्तात्रय पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदिप घुगे, फायर ऑफीसर, सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत विभाग यांनी संयुक्त भेट देऊन सकाळी पाहणी केली. त्यावेळी बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वार्‍याने बिघाड झाल्याचे दिसून आले. तेथे आगसदृश कोणतीही परिस्थिती निर्दशनास आलेली नाही.

पाण्याचे थेंब वार्‍यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले

शनिवारी मध्यरात्री वादळी वार्‍यासह झालेल्या अवेळी पावसामुळे फायर अलार्मची कंट्रोल पॅनल जो की पत्रयाच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेला होता, त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब वार्‍यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते. स्ट्रॉग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता फायर अलार्म सिस्टीम मध्ये फाल्स फायर अलार्म वाजल्याचे दिसून आले. अलार्म हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून अलार्म बंद करण्यात आला आहे.

उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेले सविस्तर चर्चा दरम्यान स्ट्रॉग रूम उघडण्याची आवश्यकता नाही, असे सर्वानुमते निर्णय

निवडणूक कागदपत्र असलेल्या स्ट्रॉगरूममध्ये असलेली फायर अलार्म यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. त्यावर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेले सविस्तर चर्चा दरम्यान स्ट्रॉग रूम उघडण्याची आवश्यकता नाही, असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

स्टाँगरुम सुरक्षित, बंदोबस्त तैनात – डॉ. राजा दयानिधी

अवेळी पावसापासूनच्या सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाययोजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त तैनात असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज