rajkiyalive

संतोष कदम खूनप्रकरणी पाच आरोपी विरोधात दोषारोप पत्र

दोन संशयित आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

संतोष कदम खूनप्रकरणी जयसिंगपूर न्यायालयात पाच आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल : . सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी पाच आरोपी विरोधात जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संशयित सिद्धार्थ बाबा चिपरीकर व शाहरुख शेख या दोन आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे तथापि दोन संशयित आरोपांच्या मुसक्या आवळण्यासाठी दोघांना फरार घोषित करून अटक वॉरंट बजावण्यासाठी न्यायालयांकडे पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले

संतोष कदम खूनप्रकरणी पाच आरोपी विरोधात दोषारोप पत्र 

कुरुंदवाड नांदणी रोडवर संतोष कदम यांचा मृतदेह गाडीत आढळला होता दरम्यान या गुन्हा मध्ये आणखीन दोन नावे निष्पन्न झाले असून, त्यामध्ये सिद्धार्थ बाबा चिपरीकर व शाहरुख शेख रा. सांगलीवाडी जिल्हा सांगली अशी आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितेश दिलीप वराळे (वय.30),सूरज प्रकाश जाधव (वय.20,दोघे,रा.सिद्धार्थ परिसर, सांगली) तुषार महेश भिसे (वय.20, आकाशवाणी केंद्राजवळ सांगली) या आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून सांगलीवाडी येथील सराईत गुंड सिद्धार्थ बाबा चिपरीकर व व शाहरुख शेख दोघे रा.सांगलवाडी यांचाही सहभाग या खून प्रकरणात असल्याची त्यांनी सांगितले आहे.

सिद्धार्थ बाबा चिपरीकर हा सराईत गुंड असून, त्याच्या विरोधात 302 गुन्हा दाखल होता

त्यांनी शिक्षा भोगुन तो बाहेर आला आहे, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. तथापि महेश संतोष कदम यांच्या नातेवाईकांनी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व बाळासाहेब गोंधळी यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने त्यांनाही दोन वेळा पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन जबाब घेतला आहे

प्राथमिक तपासात आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाला असावा असा अंदाज आहे.

मात्र दोन आरोपींची नावे उघड झाले आहेत त्यांच्याकडूनच निश्चित खुनाचे कारण समजून येईल असे पोलिसांनी सांगितले. 90 दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा नियम असल्याने पोलिसांनी तात्काळ पाच आरोपी विरोधात जयसिंगपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

फरार संशयित आरोपीवर सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी संतोष कदम यांचा खून कशासाठी केला याचे धागेदोरे निश्चित मिळतील असे त्यांनी सांगितले. मयत संतोष कदम यांच्या नातेवाईकांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी पोलिसांनी सांगितले
कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी सांगली पोलिसांनी सहकार्य करावे, असा आदेश काढला आहे. त्यामुळे संशियत आरोपीच्या शोधासाठी सांगली पोलीस सक्रिय झालेले दिसत आहेत. इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे हे तपास करीत आहेत

संतोष कदम खून प्रकरण घटनाक्रम

8 फेब्रुवारीला संतोष कदमचा खून
10 फेब्रुवारीला कदम खुनातील 3 आरोपींना अटक
14 फेब्रुवारीला मुख्य संशयित म्हणून चिपरीकर-शेख यांची नावे निष्पन्न
6मे रोजी जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
8 मे ला फरारी संशयितांच्या अटकेसाठी महानिरीक्षकांचे सांगली पोलिसांना लेखी आदेश.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज