rajkiyalive

SANGLI : मनपा क्षेत्रात 297 होर्डिंग

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई आवश्यक

जनप्रवास । सांगली
SANGLI : मनपा क्षेत्रात 297 होर्डिंग : घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापालिका क्षेत्रात 297 अधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट मनपास्तरावर होणे आवश्यक आहे. शिवाय अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहिम सुरू करणे आवश्यक आहे. भविष्यात घाटकोपरसारखी दुर्घटना घडू नये म्हणून मनपाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

SANGLI : मनपा क्षेत्रात 297 होर्डिंग

मुंबई घाटकोपर येथे वादळी वार्‍यामुळे पेट्रोल पंपावर एक होर्डिंग कोसळले होते. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील होर्डिंगबाबत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत. मनपा क्षेत्रात होर्डिंग उभे करण्यासाठी मनपाची घेणे परवानगी आवश्यक आहे. रस्त्यावर उभारण्यात येणार्‍या होर्डिंगची परवानगी घेतली जाते. मात्र खासगी जागा किंवा इमारतीवर उभा करण्यात येणार्‍या होर्डिंगची परवानगी घेण्यास संबंधिताकडून टाळाटाळ होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर होर्डिंग उभे करण्यासाठी मनपाच्या एनओसीची गरज असते. मात्र अनेकवेळा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

महापालिका क्षेत्रातील एकूण 297 होर्डिंगला परवानगी दिली गेली आहे.

या होर्डिंगचे दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडीट केले जाते. त्यानुसार काही होडिर्र्ंगचे ऑडीट झाले आहे. मात्र काहींचा अहवाल अद्याप महापालिकेला सादर झाले नसल्याची बाब समोर आली आहे. या होर्डिंगवर कारवाई करणे आवश्यक आहे. मोठ्या होर्डिंगचा पाया दहा फुटांपर्यंत खोदून भक्कम करण्यात येतो. महापालिका क्षेत्रातील सर्वच होर्डिंगच्या पायाभरणीची पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांनी करुन नंतर नाहरकत दिली जाते. तरीही चौक व मुख्य रस्त्यांवरील होर्डिंगच्या पाया व सांगाड्याची मनपाच्या विभागामार्फत तपासणी करणे आवश्यक आहे.

शिवाय शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग असल्याचे दिसत आहे.

त्यावर हातोडा पडणे आवश्यक आहे. शहरात बेकायेशीर डिजीटल बोर्डबरोबर बेकायदेशीर लहान होर्डिंग काही ठिकाणी उभे केले आहेत. बरेच होर्डिंग हे खासगी जागेत किंवा इमारतीवर आहेत. त्यामुळे परवानगी घेण्यास टाळाटाळ होत आहे. वादळी वार्‍याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगलीत अनेकदा घडले आहेत. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. भविष्यात घाटकोपरसारखी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

शहरातील होर्डिंगचा सर्वे; ऑडीटचे आदेश: आयुक्त

महापालिका क्षेत्रात होर्डिंग उभे केले आहेत. त्यांचे ऑडीट दरवर्षी केले जाते. मात्र घाटकोपर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रातील सर्व होर्डिंगचा सर्वे करून अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी व अधिकृत होर्डिंगचे मनपास्तरावर स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशा सूचना मालमत्ता विभागाला दिल्या असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. स्ट्रक्चरल ऑडीटचे रिपोर्ट देखील तातडीने सादर करा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज