सहकार आयुक्तांकडे तक्रार
जनप्रवास । प्रतिनिधी
ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल : सांगली ः आटपाडीतील बाबासाहेब देशमुख शेतकरी सूतगिरणीची थकित कर्जापोटी अवघ्या साडेअकरा कोटीमध्ये विक्री करण्यात आली. या विक्री प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली नाही. या प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने सहकार आयुक्तांकडे करण्यात आली.
ATPADI : बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीत गोलमाल
देशमुख सूतगिरणी थकित कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होती. सूतगिरणीवर महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग मंडळाने भाग भांडवल म्हणून 21 कोटीची गुंतवणूक केली होती. जिल्हा बँकेचे 14 कोटी व बँक ऑफ इंडियाचे 21 कोटी देणे होते. त्या रकमेचा प्रॉपर्टीवर बोजा होता. सूतगिरणीच्या मालमत्तेची विक्री होत असताना जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिकार्यांनी कायदेशीर बाबींचा विचार न करता 50 कोटीचे मूल्यांकन असलेल्या सूत गिरणीची प्रॉपर्टी ही 11.50कोटीस विक्री करण्यात आली. सूतगिरणीकडील देणी देण्याची जबाबदारी बँकेची असताना ती जबाबदारी खरेदी देशमुख इंडस्ट्रीज ढकलण्यात आली आहे.
संस्थेची स्थावर मिळकत जमीनीबाबत चुकीचा अकृषिक परवाना घेऊन तेथे बेकायदेशीरपणे प्लॉट पाडून जमीन विक्री केली जात आहे.
मात्र जमीन विक्रीची रक्कम शासकीय भागभांडवलापोटी शासनाकडे जमा केली जात नाही. ही बाब गंभीर आहे. ज्या कारणासाठी कर्ज मंजूर केले आहे. त्या कारणासाठीच कर्जाचा उपयोग होत नाही, या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेे आहे.
बँकेच्या निधीचा संगनमताने गैरवापर केलेला आहे.
त्यासाठी संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात यावी. याशिवय सहकार विभागाने तात्काळ विक्री व्यवहार रद्द करुन पूर्वीसारखी व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनी केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.