rajkiyalive

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद

: 1 लाख 56 हजारांचा मुद्देमाल केला जप्त : शेअर मार्केटच्या नुकसानीत लागला चोरीचा नाद.

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद : सांगली : कवलापूर येथील विद्यार्थ्यांच्या घरातून लॅपटॉप चोरणार्‍या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या तरुणास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तरुणांकडून चोरीतील 1 लाख 56 हजार रुपये किमतीचे महागडे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी बुधगाव मध्ये केली.

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद : धनाजी ज्ञानेश्वर जाधव (वय 20 रा. बलगवडे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, धनाजी हा बी टेक च्या दुसर्‍या वर्षात शिकत असून शेअर मार्केट च्या ट्रेडिंग मध्ये नुकास झाल्याने त्याला चोरीचा नाद लागल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

दोघा तरुणांच्या भाड्यातील खोलीमधून महागडे दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी खिडकीमधून चोरून नेले होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या यश संखे आणि साहिल सहाणे या दोघा तरुणांच्या भांड्यातील खोलीमधून महागडे दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी खिडकीमधून चोरून नेले होते. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. याचा तपास करत असताना हेड कॉन्स्टेबल महेश जाधव यांना सदरची चोरी हि बलगवडे येथे राहणार्‍या संशयित धनाजी जाधव याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद : त्याप्रमाणे जाधव याला तातडीने बुधगाव येथून जेरबंद केले.

त्याच्याकडे लॅपटॉप चोरी बाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्याने आणखी एक लॅपटॉप चोरून त्याची विक्री केल्याचे सांगितले. यानंतर सदरचा विक्री केलेला लॅपटॉप ताब्यात घेतला.

यावेळी त्याच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक निरीक्षक सुशांत पाटील, हेडकॉन्स्टेबल महेश जाधव, मनोज नीलकंठ, मेघराज रुपनर, सुशील म्हस्के, बंडू पवार, रणजित घार्गे, यासिन फकीर यांच्या पथकाने केली.

SANGLI : विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणारा इंजिनियर तरुण जेरबंद { ऑनलाईन शेअर मार्केट च्या नादात करिअर बरबाद…

अटकेतील धनाजी जाधव हा सधन कुटुंबातील आहे. आई वडील शेती करतात. तर धनाजी हा बुधगाव येथे इंजिनिअरिंग बी टेक च्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला ऑनलाईन शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा नाद लागला. लाखो रुपये उसनवारी करून त्याने गुंतवले मात्र फायदा नाही तर नुकसानच झाले. त्यातूनच त्याला चोरीचा नाद लागला. बुधगाव मध्ये ज्याठिकाणी विद्यार्थी भाड्याने राहायचे तेथील विद्यार्थ्यांचे त्याने लॅपटॉप चोरल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज