rajkiyalive

MAHARASHTRA STATE BOARD 12TH RESULT : बारावीचा उद्या 21 रोजी निकाल

सांगली जिल्ह्यात 34 हजार विद्यार्थी

MAHARASHTRA STATE BOARD 12TH RESULT : बारावीचा उद्या 21 रोजी निकाल : सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार आहे. सीबीएसई पॅटर्नचा निकाल लागल्याने राज्य मंडळाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील 33 हजार 798 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी, पालकांची प्रतिक्षा संपणार आहे.

MAHARASHTRA STATE BOARD 12TH RESULT : बारावीचा उद्या 21 रोजी निकाल

राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार ? या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. परीक्षा दिलेल्या सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

जिल्हयात 320 उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, जिल्ह्यातील 51 केंद्रांवर 33 हजार 798 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती.

बारावी परीक्षेचे 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील 3 हजार 320 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 10 हजार 497 कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8 लाख 21 हजार 450 विद्यार्थी व 6 लाख 92 हजार 424 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
या संकेतस्थळावर पाहता येतील गुण

निकालाची मूळ प्रत दहा दिवसांनी मिळणार

निकालाच्या तारखेनंतर साधारण 10 दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज