इस्लामपूर पोलीसात भाजपा-राष्ट्रवादी परस्पर विरोधी फिर्यादी
इस्लामपूर ः प्रतिनिधी
ISLAMPUR : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीचा पदाधिकारी ताब्यात : भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी चंद्रशेखर प्रकाश तांदळे (रा.धनगरगल्ली, इस्लामपूर) याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
ISLAMPUR : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीचा पदाधिकारी ताब्यात
सांगली पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तांदळेला ताब्यात घेतले आहे. तांदळे यांनीही त्यांना दमदाटी केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अक्षय विजय कोळेकर (रा.अहिल्यानगर, इस्लामपूर) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
निशिकांत पाटील यांच्या विरोधात एका व्हॉटसअपग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चंद्रशेखर तांदळे यांनी शुक्रवार दि.24 मे रोजी रात्री भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या विरोधात एका व्हॉटसअपग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यावरून ग्रुपवर वादंग झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी तांदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.
पोलिसांनी तांदळेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
अजित पाटील यांनी फिर्याद दिली. चंद्रशेखर तांदळे यांनीही दमदाटी झाल्याची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. शुक्रवारी रात्री अक्षय कोळेकर याने फोनवरून शिविगाळ व दमदाटी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तांदळे याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.